Posts

मालव्या योग

गर्दीतून जाताना, आपल्या अवतीभवती आपल्याला आनंदित, उत्साही, सुंदर, ऐश्वर्यसंपन्न,  आरामाची जीवनशैली असणारे ,एखाद्या कलेमध्ये घडून गेलेली, कलेच्या क्षेत्रात किंवा इतर कोणत्याही आवडीच्या क्षेत्रात अत्यंत यशस्वी असणारी माणसं दिसतात.  आपल्या वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये अशी माणसं बहुतांशी मालव्या योग घेऊन जन्माला आलेली असतात.  गुरु हा सात्विक वृत्तीचा आहे आणि शुक्र हा राजसी वृत्तीचा , त्यामुळे एकीकडे हंस योग आदर्शवादी अध्यात्मिक आणि अतिशय व्यापक दृष्टिकोन असलेला तर मालव्य योग प्रेम, माया अशा भौतिक सुखाकडे जास्त झुकणारा आहे. हा मालव्ययोग एक उच्च दर्जाचा योग मानला जातो. जो तुम्हाला अत्यंत यशस्वी, आकर्षक, कीर्तीवान बनवण्याची पात्रता ठेवतो.  पंचमहापुरुष योगांपैकी हा मालव्ययोग शुक्रामुळे तयार होतो. जेव्हा शुक्र हा केंद्रस्थानात म्हणजे लग्न, सुख, जया किंवा कर्म स्थानात असेल आणि तो जर स्वरशीचा किंवा उच्च राशीचा असेल तरच हा योग तयार होतो. हा हा एक उच्च दर्जेचा राजयोग मानला जातो जो उत्तम भाग्य प्रदान करतो कारण हा योग नैसर्गिक शुभ ग्रहा मुळे तयार झालेला आहे.  फलदीपिकेमध्ये मालव...

वार क्रम

तुम्ही कधी विचार केला आहे का की   वाराचा क्रम ‌ रविवार ‌, सोमवार मंगळवार,  बुधवार गुरुवार, शुक्रवार , शनिवार ‌ असाच का असावा. 24 तासाचा एक दिवस असतो,  सूर्य उगवल्यापासून पुन्हा तोदिवशी वी पर्यंतचा काळ म्हणजे वार किंवा वासर. रविवार ते शनिवार असा एक आठवडा असतो. 24 तासाचा एक दिवस 24 तास म्हणजे साठ घटका.दर तासाला आकाशातील ग्रहांचे पृथ्वीशी होणारे अंशात्मक अंतर बदलते याला होरा ⌛ असेही म्हणतात.  होरा म्हणजे तास. खरा शब्द अहोरात्र यापासून होरा शब्द निर्माण झाला. अहोरात्र म्हणजे 24 तास. गणितामध्ये  भाग पडल्याशिवाय गणित व्यवस्थित सुटत नाही. जसे तासाचे मिनिटे ,मिनिटाचे सेकंद. तसाच अहोरात्र म्हणजे 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र. ह्यालाच अहोरात्र म्हणतात. त्यातील एक एक तासाचा विचार करण्यासाठी सुरवातीचा  ,' अ' आणि शेवटचा 'त्र ' हे काढून् उरणारा शब्द  'होरा' हा प्रत्येक तासासाठी वापरतात. दिवसाचा प्रत्येक होरा विशिष्ट ग्रहाला दिला आहे. म्हणजे प्रत्येक होरा वर ग्रहांचा अंमल आहे. प्रत्येक ग्रहा च्या होराचा विशिष्ट क्रम आहे. मंद गती ग्रहापासून जलद गतीच्या ग्रहा...

भगवंताशी हितगुज

भगवंताशी हितगुज|  उदरात मातेच्या भासे, संगे तूं माझ्या देवा ।। भूवरी जन्म होता, लोळवी मला तुज चरणी देवा ।। न्यहाळता किलकिल्या डोळ्यांनी, कळेना लिला तुझी देवा ।। हरविलास तूं सोपोनी गणगोता, करण्या सांभाळ माझा देवा ।। पालथा होता घुसू लागता, धरितो तव चरण देवा ।। चरणाचिच ओळख तेवढी, लोटांगण घालण्या देवा ।। उचलुनि घेता माय माझी, विसरतो माया तुझी मी देवा ।। न राहवेना कडी कुणाच्या,तुझे चरण सोडुनी देवा ।। रांगण्याचे बळ येता, देवघरात पाहतो तुला देवा ।। निकट येण्याची करुनि धडपड, उचलुनि घेतो तुला देवा ।। सोडुनी देव्हारा, इथेतिथे फिरशी मजसवे तूं देवा देवघराची रिती जागा बघुनी, रंजन माझे होते देवा ।। बोल बोबडे पिटून टाळ्या, भजतो तुला मी देवा ।। कवतिक वाटे मायबापा, सुखी ठेव म्हणती देवा ।। शुभं करोती रोज म्हणुनी, पाया पडी तुज देवा ।। भासे खरेच पाठिवरती, तुझा वरत हस्त देवा ।। होता कुमार वयाचा जेव्हा, विसर पडतो तुझा देवा ।। देता परिक्षा धरुनी आस फळाची, होते स्मरण तुझे देवा ।। मायबापाचा घेता आशिष, भासती ते तुझ्या रुपी देवा ।। बळ कसे कोठून येते, लिला तुझी, यश पदरी पडते देवा ।। तारुण्याचा जोम वेगळा, वाटे...

पुढील वाट

पुढली वाट व्रुद्ध होता दिसे सामोरी          दिवस संपण्याचे येथवरी येता रेटले          गाडे संसाराचे पुर्ण करण्या अपेक्षा झगडलो दमलो           सरले बळ अंगाचे आता न होयी पायपिट           ओझे झाले देहाचे भव्य घराच्या कोपराशी            जडले नाते सख्ख्याचे उचंबळी उरी तरुण भावना            सुरेल शब्द अधराचे कुणी यावे निकट बसावे        करावे देणेघेणे शब्दांचे व्रुद्धत्व जाई विसरल्या      मिळता सोबती जीव्हाळ्याचे जन्म जोवरी होता भूवरी       जोडले आप्त मित्र चव्हेरी हिच पुंजी वाटे उर्जा      भागविण्या मम गरजा आता कशाची न करणे आशा    तुडविले रान सुख दु:खाचे आता सरसावे कात टाकण्या    पांग फेडण्या आयुष्याचे झोळी आठवणिची सोडुनि जाता      मागे वळाया नको दुर दिशांनाही नसे अंत     मावळण्या मिळे खुला आसमंत       ...

आजोबा

कष्ट केले रात्रंदिवी, दिवस करुन रात्रीचा हेलावते ह्रुदय स्मरता, भुतकाळ तो सुगिचा देह थकला, कणा वाकला, सुटे कंप हाताला झोप येइना थारा मनी, नाना विचाराला़़़़़़़़़़़़़़़ नातवांशी खेळ खेळता, ना तुम्हाला थकवा खेळण्यात दंग होता, विसरता रुसवाफुुगवा शब्द बोबडे बोळक्यातले, जागवी   शिशुत्वाला किलकिलाट तो नातवांचा, ऐकु येइना कानाला़़़़़़़़़़़़़़़़़ पुरे खेळणे आबा तुमचे, नसे तुम्हा घोर जनक जननिचे रागे भरणे, वर बुक्क्यांचा मार दिवसभराचे चरणे तुमचे, होतो त्रास पचनाचा झोप आमची किरकिर करते, भंग होतो शांतीचा़़़़़़़़़़़़़़़़़ झोपा आता आबा तुन्ही, अर्धी रात्र ढळली नका देऊ ठसका खोकला, गिळून घ्या उबाळी शिंकुनशिंकुन नाकपुडी बुजली, नको बुजाया दुजी होऊ उद्याला सज्ज खेळण्या, करु धमाल कमालिची़़़़़़़़़़़़़़                     बाळ लोखंडे

गजरा

गजरा "अग--जरा" मधून 'अ' काढीता राहतो शब्द "गजरा" तापलेल्या बायकोला शांत करण्या तिला हवा गजरा दिवसभराचा ताण विसरण्या माळवून गजरा मिळे हवे ते येता घराला किमया दाखवी गजरा लचकत मुरडत चाल तिची लावूनी वेणिला गजरा बहकते चाल मागल्याची वेडावितो सुगंधी गजरा उनाड वारा दचकवी, मोहवी मोग-याचा गजरा काळ्याकुट्ट आंबाड्याला दिसे साजरा वेटोळा गजरा नाजुक काया, गौरवर्णाला फुलवी अबोली गजरा अलंकार ते पडती फिक्के नसता सवे अल्पमोली गजरा नागमोडी तिच्या वेणिला गुरफटून राहतो गजरा पाहुनी सळसळ वेणिची कवी मनाला डंख मारतो गजरा दारी पोचता नायिकिणीच्या बांधुनी मनगटी गजरा  मुज-याची रसिकता चाटण्या नाकी सुगंधी गजरा धनवान, नबाब,राजे होती दंग नाचती हलविता गजरा आठविता दारा अन घराला तोवरी कोमेजून जाई गजरा                     बाळ लोखंडे

मना चंदनाचे परी त्वां झिजवावे

मना चंदनाचे परी त्वा झिजवावे ह्याचा अर्थ वेगळा सांगायची गरज नाही. इथे चंदनाच्या खोडाप्रमाणे आपले आयुष्य असावे , झिजले तरी कर्तृत्वाचा सुगंध मागे ठेवायचा असतो. हा तर केवळ झाडाच्या तोडलेल्या खोडाचा विचार समोर ठेवला गेला. ह्या झाडाची जीवन यात्राही माणसाला खूप शिकवून जाते.  हा वृक्ष स्वच्छ जागी छान बहरलाय अस कधीच दिसणार नाही. खरं तर हे झाड एकटे कधीच जगू शकत नाही. ह्याच्या रोपा सोबत याला आपल्या अनेक सवंगड्याची साथ लागते. रानातील झाडे, झुडपे, गवत ह्यांची साथ घेऊनच ते मोठे होते. सर्वांची साथ घेऊनच ह्याचा सुंदर डौलदार वृक्ष तयार होतो. ह्या झाडाची लागवड करणाऱ्याला ह्याच्या सवंगाड्यांनाही मान देणे आवश्यक होते. कारण आपल्या सवंगाड्यां शिवाय हा वृक्ष जगूच शकत नाही. हेच त्या वृक्षाचे त्याच्या छोट्या मोठ्या सवंगड्यावरील प्रेम. मग ह्याचे गंध देवांना कसे आवडणार नाही. चंदना प्रमाणे आपले कर्तृत्व असावे, आणि त्याच्या प्रमाणेच वाढावे.  स्नेहल जरुळकर