गजरा

गजरा

"अग--जरा" मधून 'अ' काढीता राहतो शब्द "गजरा"
तापलेल्या बायकोला शांत करण्या तिला हवा गजरा
दिवसभराचा ताण विसरण्या माळवून गजरा
मिळे हवे ते येता घराला किमया दाखवी गजरा

लचकत मुरडत चाल तिची लावूनी वेणिला गजरा
बहकते चाल मागल्याची वेडावितो सुगंधी गजरा
उनाड वारा दचकवी, मोहवी मोग-याचा गजरा
काळ्याकुट्ट आंबाड्याला दिसे साजरा वेटोळा गजरा

नाजुक काया, गौरवर्णाला फुलवी अबोली गजरा
अलंकार ते पडती फिक्के नसता सवे अल्पमोली गजरा
नागमोडी तिच्या वेणिला गुरफटून राहतो गजरा
पाहुनी सळसळ वेणिची कवी मनाला डंख मारतो गजरा

दारी पोचता नायिकिणीच्या बांधुनी मनगटी गजरा 
मुज-याची रसिकता चाटण्या नाकी सुगंधी गजरा
धनवान, नबाब,राजे होती दंग नाचती हलविता गजरा
आठविता दारा अन घराला तोवरी कोमेजून जाई गजरा
                    बाळ लोखंडे

Comments

Popular posts from this blog

47th Wedding anniversary poem

Third House in Astrology (तृतीय स्थान)