Posts

मालव्या योग

गर्दीतून जाताना, आपल्या अवतीभवती आपल्याला आनंदित, उत्साही, सुंदर, ऐश्वर्यसंपन्न,  आरामाची जीवनशैली असणारे ,एखाद्या कलेमध्ये घडून गेलेली, कलेच्या क्षेत्रात किंवा इतर कोणत्याही आवडीच्या क्षेत्रात अत्यंत यशस्वी असणारी माणसं दिसतात.  आपल्या वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये अशी माणसं बहुतांशी मालव्या योग घेऊन जन्माला आलेली असतात.  गुरु हा सात्विक वृत्तीचा आहे आणि शुक्र हा राजसी वृत्तीचा , त्यामुळे एकीकडे हंस योग आदर्शवादी अध्यात्मिक आणि अतिशय व्यापक दृष्टिकोन असलेला तर मालव्य योग प्रेम, माया अशा भौतिक सुखाकडे जास्त झुकणारा आहे. हा मालव्ययोग एक उच्च दर्जाचा योग मानला जातो. जो तुम्हाला अत्यंत यशस्वी, आकर्षक, कीर्तीवान बनवण्याची पात्रता ठेवतो.  पंचमहापुरुष योगांपैकी हा मालव्ययोग शुक्रामुळे तयार होतो. जेव्हा शुक्र हा केंद्रस्थानात म्हणजे लग्न, सुख, जया किंवा कर्म स्थानात असेल आणि तो जर स्वरशीचा किंवा उच्च राशीचा असेल तरच हा योग तयार होतो. हा हा एक उच्च दर्जेचा राजयोग मानला जातो जो उत्तम भाग्य प्रदान करतो कारण हा योग नैसर्गिक शुभ ग्रहा मुळे तयार झालेला आहे.  फलदीपिकेमध्ये मालव...

गुरुच्या राशीतला राहू आणि शुक्राच्या राशीतला राहू

गुरुच्या राशीत राहू आणी शुक्राच्या राशीत राहू राहू हा अतिशय रहस्यपूर्ण , मायावी , गुप्त ता असणारा   ग्रह आहे .  संस्कृत मध्ये धातू ‘ र :’ म्हणजे लपून ठेवणे . त्यापासूनच राहू ने नाम तयार होतो . तर रहस्य , माया , भ्रम , गुपित , आभासी जग ह्याचा कारक असणारा राहू , दोन नैसर्गिक शुभ ग्रहाच्या राशीत कसा फळेल ?,   तो कोणच्या पद्धतीचे फळ म्हणजे गुरु जे देवातांचे गुरु आणि शुक्राचार्य जे दैत्यांचे गुरु ह्यांदोघांच्या राशींना देईल ? दोघंही गुरु पदी असल्यामुळे नैसर्गिक शुभता गुरु व शुक्रात आहे . त्यामुळे जीवनातील सुखाची , आनंदाची जवाबदारी ह्या ग्रहांवर येते . गुरु आत्मिक आनंद तर शुक्र भौतिक आनंद देणारा .  गुरु पूर्णपणे सात्विक तर शुक्र पूर्णपणे राजसि .  आणि अत्यंत गूढ आणि समजण्यास कठीण असणारा तामसी ग्रह राहू . जो सात्विकतेचे सोंग घेऊन म्हणजे तो दैत्य असून देवातांचे सोंग घेऊन अमृत प्रशान करण्यासाठी देवतांमध्ये त्यातही दोन प्रकाशित देवातांमध्ये म्हणजे चंद्र व रवी ह...