मालव्या योग
आपल्या वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये अशी माणसं बहुतांशी मालव्या योग घेऊन जन्माला आलेली असतात.
गुरु हा सात्विक वृत्तीचा आहे आणि शुक्र हा राजसी वृत्तीचा , त्यामुळे एकीकडे हंस योग आदर्शवादी अध्यात्मिक आणि अतिशय व्यापक दृष्टिकोन असलेला तर मालव्य योग प्रेम, माया अशा भौतिक सुखाकडे जास्त झुकणारा आहे.
हा मालव्ययोग एक उच्च दर्जाचा योग मानला जातो. जो तुम्हाला अत्यंत यशस्वी, आकर्षक, कीर्तीवान बनवण्याची पात्रता ठेवतो.
पंचमहापुरुष योगांपैकी हा मालव्ययोग शुक्रामुळे तयार होतो. जेव्हा शुक्र हा केंद्रस्थानात म्हणजे लग्न, सुख, जया किंवा कर्म स्थानात असेल आणि तो जर स्वरशीचा किंवा उच्च राशीचा असेल तरच हा योग तयार होतो.
हा हा एक उच्च दर्जेचा राजयोग मानला जातो जो उत्तम भाग्य प्रदान करतो कारण हा योग नैसर्गिक शुभ ग्रहा मुळे तयार झालेला आहे.
फलदीपिकेमध्ये मालव्ययोगाची फळे म्हणजे या योगात जन्मलेला जातक दृढ निश्चयेई, सर्व वैभवाने युक्त, धनवान, उत्तम स्त्री पुत्रा दि ने युक्त, सौभाग्य संपन्न, स्वादिष्ट भोजन ग्रहण करणारा, अनेक वाहनांनी युक्त, यशस्वी, विद्वान आणि प्रसन्नं अंतकारणाचा असतो.
जातक पारिजाते या ग्रंथात मालव्या योगामध्ये उत्पन्न झालेले जातक हे स्त्री समान हावभाव करणारे, स्त्रियांप्रमाणे सुंदर शरीर आणि सुंदर नेत्र असलेले आणि गुणवान असतात. तसेच ते तेजस्वी, स्त्री पुत्र आणि वाहनादी भौतिक सुखाने युक्त असून धनवान असतात. शास्त्रांचे मर्म जाणणारी समजणारी विद्वान पंडित या योगावर जन्म घेतात, अतिशय उत्साही व्यक्तिमत्, शक्ती संपन्न, मंत्र तंत्रातही कुशल असे वर्णन जातक पारिजात मध्ये मालव्ययोगाचे केलेले आहे. जातक परिजात मध्ये ह्या योगा बद्दल आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे या योगा मुळे जातकामध्ये परस्त्री गमनाचा योग येतात. यात जातकाची 77 वर्षे आयु मर्यादा सांगितलेली आहे.
स्थिर ,चर आणि द्विस्वभाव या तिन्ही लग्नांवरती हा योग होऊ शकतो.
मेष, वृश्चिक, आणि कन्या या लग्नाला सप्तमातून मालव्यय योग होईल.
वृषभ, तूळ, आणि मीन लग्नाला लग्नातूनच हा योग होईल.
मिथुन सिंह आणि मकर या लग्नाला दशम म्हणजे कर्म स्थानातून हा योग होईल.
धनु कुंभ आणि कर्क या लग्नाला चतुर्थस्थानातून म्हणजे सुखस्थानातून हा योग होईल.
नौशाद ह्यांची कुंडली बघा
25-12-1919
20:00
Lucknow
कर्क लग्नाची, सुख स्थानात शुक्र मालव्या योग करत आहे.
लग्नातील गुरु मुळे हंस योग सुद्धा होत आहे , पण गंडांतर नक्षत्रात असल्यामुळे मालव्यवयोगला फलित व्हायला वाव जास्त मिळाला.
नौशाद ह्यांना कोण नाही ओळखत , एक प्रसिद्ध गीतकार, संगीतकार, डायरेक्टर. त्यांच्या संगीतात शास्त्रीय संगीताची झलक होती, कारण हंस योगाची साथ मिळाली .
चतुर्थात मालव्ययोग असल्यामुळे त्यांना अगदी लहानपणा पासूनच शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली.
वायुतत्व असणाऱ्या राशीत हा योग झाल्यामुळे शुक्राच्या कल्पकतेला , लॉजिकला खूप वाव मिळतो. वायुतत्वाला गती असते त्यामुळे एकाच प्रकारच्या कामात रमायला जमत नाही. किंव्हा काम एकाच पद्धतीने करायला आवडत नाही. शुक्र तुळेसारख्या वायू राशीचा मालक असल्यामुळे कलेत नवनवीन आविष्कार करायच्या कल्पना येणारच. त्यात तो मालव्ययोग करतो म्हणजे त्या कलेला प्रसिद्धी मिळणारच.
या योगाला आणखीन धार मिळाली ती शुक्रा ज्या नक्षत्रात आहे त्यामुळे , शुक्र विशाखा (विशाखा नक्षत्र जल तत्वाचे आहे) नक्षत्रामध्ये असून नक्षत्र स्वामी गुरु लग्नात हंस योग करत आहे. विशाखा नक्षत्र आणि शुक्र दोन्ही जळ तत्वाचे असल्याने शुक्राला पोषक वातावरण मिळाले.
नक्षत्र स्वामी गुरु आश्लेषा मध्ये असून त्याचा नक्षत्र स्वामी बुध पंचमस्थानामध्ये राहूच्या युतीत आहे.
राहू हा परंपरेच्या बाहेर विचार करायला लावतो, आऊट ऑफ द बॉक्स .नौशाध हे पहिली संगीतकार असे होते की ज्यांनी वेस्टर्न संगीत आणि भारतीय संगीत याचा मेल चित्रपटांमध्ये जमवून आणला आणि त्याला जोरदार प्रसिद्धी मिळाली. एकीकडे भारतीय वाद्य तर दुसरीकडे त्याला साथ देणार वेस्टर्न वाद्य असा मेल त्यांनी त्यांच्या संगीतात घडवून आणले.
वायुराशीतला शुक्राचा प्रभाव म्हणजे त्यांनी दिग्दर्शन केलेले गाणी जास्तीत जास्त नायक नायिका पियानो वरती बसून गायलेली दाखवलेली आहेत.
शनीसारख्या मित्र ग्रहाची दृष्टी अग्नि तत्वाच्या राशीतून शुक्रावर येत आहे यामुळे मालव्या योग आणखीन उजळतो आहे. अग्नितत्त्वाचं काम प्रकाश टाकणं आहे. दादासाहेब फाळके अवॉर्ड, पद्मभूषण अवॉर्ड १९८१ / १९८२ साली मिळाले.
त्यांनी संगीत दिलेल्या mother इंडिया ऑस्कार्ड साठी नॉमिनेटेड झाली. कदाचित चतुर्थातून मालव्या योगच फळ असेल. योगायोग.
मालव्या योग आपल्याला महात्मा गांधींच्या कुंडलीत सुध्दा लग्नातून होतांना दिसतो. तूळ लग्नात शुक्र, मंगळ आणि बुधाची युती आहे. त्यावर गुरूची दृष्टी असल्यामुळे धर्म अध्यात्म आणि राजकारण ह्यांची सांगड त्यांना बाहखुबीने घालता आली. आणि त्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी असे गौरवण्यात आले.
मालव्या योगातील शुक्राला बुध आणि मंगळाची आणि खास करून तुलेची मुत्सद्दी बुद्धी मिळाल्याने त्यांची कीर्ती अजरामर झाली.
आता वृषभ राशीकडे वळू
वृषभ राशीतून होणारा मालव्य योग धनाच्या बाबतीत हव्यास जास्त असतो. तशीही काल पुरुषाच्या कुंडलीमध्ये ही रास धनस्थानात येते आणि पृथ्वी तत्वाची असल्यामुळे संग्रही करण्याची वृत्ती या राशीत खूप जास्त असते.
शुक्र असल्यामुळे कला कौशल्य या गोष्टीत येतातच पण या गोष्टींचा वापर करून धनसंपादन कसं करावं हे वृषभ राशीमुळे होणाऱ्या मालव्ययोगातील जातकाला सहज जमत. ऐहिक सुखाकडे आणि व्यावहारिकतेकडे जास्त झुकणारा वृषभेतला मालव्या योग असतो. शुक्र तसाही संपत्ती आणि ऐश्वर्याचा कारक आहे.
तूळे प्रमाणे अध्यात्म तत्त्वज्ञान यासारखी विषय त्यांना जमत नाही.
दशामातून मालव्य योग होणारी
ही पुढील कुंडली...... ह्यात वृषभ राशि मध्ये शुक्र आहे.
वृषभ रास ही पृथ्वीरत्वाची तर शुक्र जल तत्वाचा त्यामुळे शुक्राचा भावनिक हळवेपणा कमी होऊन व्यवहारी वृत्ती , फायद्या तोट्याचा विचार करण्याची वृत्ती असते. त्यामुळे ऐहिक उत्कर्ष सहज लाभते.
वृषभ रास ही स्त्री स्वभावाची असल्यामुळे व्यवहारीक कुशलते सोबत वात्सल्य सुद्धा दिसून येत. त्यामुळे नातीगोती, संबंध सांभाळून उत्कर्ष साधणारी ही रास आहे.
स्त्री
July 9 /1998
8.44am
नागपूर
जन्म हिचा खूप जास्त सुखव वस्तू कुटुंबात झाला. वकृत्व उत्तम आहे. भाषेवर प्रभूत्व उत्तम आहे. व्यवहारीक कुशलतेमुळे हिचे सल्ले इतरांना फायद्याचे वाटतात.
शिक्षण झाल्याबरोबर नोकरी सुद्धा सहज आणि भरपूर पगाराची लागली. नोकरी लागल्याबरोबर लग्नही एका वैभव संपन्न घराण्यात झाला.
2025 च्या सहा जूनला तिचं लग्न झालं.
आता
मीन राशीतून होणारा मालव्य योगाकडे वळू. शुक्रही जळतेवाचा आणि मीन रास पण. त्यामुळे भावनांची आर्द्रता, प्रेम ,जिव्हाळा, तूळ आणि वृषभ पेक्षा जास्त मीन राशीत जाणवते. ह्यात शुक्राचे गुण जास्तबप्रकासने अनुभवायला मिळतात. अतिशय भावनप्रधान असल्यामुळे मीन राशीच्या मालव्या योगात भावनांच्या भरात वाहून नेण्याची क्षमता जास्त असते.
Talat Mehmood
24/2/1924
20.00
लखनौ
सप्तमातून मालव्या योग होत आहे.
ते playback सिंगर आणि गझल गायक म्हणूनच जास्त प्रसिद्धीला आले.
मीन रास आणि शुक्र दोन्ही जल तत्वाचे असल्यामुळे अतिशय सुस्वभावी, संवेदनशील, प्रेमळ व्यक्तिमत्व होत. त्यांनी रोमँटिक तसेच दर्द भरे गाणे जास्त म्हटलेले आहेत. 1992 मध्ये त्यांना पद्मभूषण अवॉर्ड मिळाले.
मीन राशीतील मालव्य योगाला समर्पण, दयाळूपणा, क्षमा शीलता, समंजसपणा आणि अतिभावनाशीलतेची आणि श्रद्धेची जोड आहे.
वृषभ राशि मध्ये व्यवहारिकता जास्त आढळते, तर तूळ राशीमध्ये अध्यात्मिक , कल्पकता, संशोधन वृत्ती आढळून येते.
कला ,कीर्ती ,वैभव, ऐश्वर्या ,सौंदर्य, कंफर्ट्स त्याचबरोबर व्यवहारी दृष्टिकोन या सर्वांनी नटलेला हा पंचमहापुरुषा मधला मालव्ययोग आहे.
सौ. स्नेहल जरुळकर
Comments
Post a Comment