भगवंताशी हितगुज
भगवंताशी हितगुज|
उदरात मातेच्या भासे, संगे तूं माझ्या देवा ।।
भूवरी जन्म होता, लोळवी मला तुज चरणी देवा ।।
न्यहाळता किलकिल्या डोळ्यांनी, कळेना लिला तुझी देवा ।।
हरविलास तूं सोपोनी गणगोता, करण्या सांभाळ माझा देवा ।।
पालथा होता घुसू लागता, धरितो तव चरण देवा ।।
चरणाचिच ओळख तेवढी, लोटांगण घालण्या देवा ।।
उचलुनि घेता माय माझी, विसरतो माया तुझी मी देवा ।।
न राहवेना कडी कुणाच्या,तुझे चरण सोडुनी देवा ।।
रांगण्याचे बळ येता, देवघरात पाहतो तुला देवा ।।
निकट येण्याची करुनि धडपड, उचलुनि घेतो तुला देवा ।।
सोडुनी देव्हारा, इथेतिथे फिरशी मजसवे तूं देवा
देवघराची रिती जागा बघुनी, रंजन माझे होते देवा ।।
बोल बोबडे पिटून टाळ्या, भजतो तुला मी देवा ।।
कवतिक वाटे मायबापा, सुखी ठेव म्हणती देवा ।।
शुभं करोती रोज म्हणुनी, पाया पडी तुज देवा ।।
भासे खरेच पाठिवरती, तुझा वरत हस्त देवा ।।
होता कुमार वयाचा जेव्हा, विसर पडतो तुझा देवा ।।
देता परिक्षा धरुनी आस फळाची, होते स्मरण तुझे देवा ।।
मायबापाचा घेता आशिष, भासती ते तुझ्या रुपी देवा ।।
बळ कसे कोठून येते, लिला तुझी, यश पदरी पडते देवा ।।
तारुण्याचा जोम वेगळा, वाटे मीच सर्वस्वी माझा देवा ।।
अहंकार तो वाढत जाता, दूर तुला सारतो देवा ।।
उपलब्धी मिळता नसे तमा, नसे घोर, मला देवा ।।
होण्या विकास सदैव माझा, नकळत पाठिशी उभा तूं देवा ।।
वार्धक्याने शरीर थकले,मती गुंठते, होयी स्मरण तुझे देवा ।।
तुझ्या नामाचा जप तो करण्याविना, नसे पथ दुजा देवा ।।
रुप तुझे न पडता नयनी, होतो मी कष्टी देवा ।।
तान्हुल्यासम पांगळा होउनी, धरितो चरण तुझे देवा ।।
बाळ लोखंडे
कृतज्ञता, खूप भावपूर्ण लेखन🙏🏻
ReplyDelete