47th Wedding anniversary poem
तू
वर्षे झाली चाळीस आणि सात
प्रदीर्घ सहवासी तुझी माझी साथ
गेले निघूनी दिवस मास वर्ष
आठवणीचे पेव फुटले सुख, दू;ख, हर्ष.
किती
किती केले, उपसले तू कष्टच
पण
जाणविले नाही होते ते ईष्टच ,
रूसवे, फुगवे नाही, कमाल सहनशील
तू,
मलाच
नाही उमगले अशी कशी तू.
माझ्यात काय मी बापडा,
उभा राहिलो दाराशी घेऊन छकडा,
सवे चालीलो नेशिल त्या दिशेला,
होता म्हणून विश्वास भुललो न मी दिल्या सुखाला.
ममत्व, वात्सल्य
वसले तुझ्यात ठाई ठाई
न्यूनता
नसे कशी पूर्णत्व ठाई ठाई,
अति हर्ष, शोक नसणे
समाधान ही संपत्ति
प्रिय
भाष्य करुनि सुखवि अशीच वृत्ती.
रागे न भरली परी नेत्र तेच उक्ती,
जागी असे ती नम्रता न मत्सर तव चित्ती,
लट्क्याच रागे, होई प्रेम द्विगुणित,
आशीष द्यावया तव हस्त सदैव वरत.
भासली ना
उणीव कशाची, आहेस निर्भया,
अर्थ, स्वास्थ्य, मतिची बेरीज
हीच किमया,
भागविलेस
तू चव्हेरि संचित प्रारब्धाला ,
आहोत उभे
आम्ही, भागीदार त्या विनिमयला.
केला हट्ट, केली बळजबरी माझ्याच तत्वाची,
पण तूच ती, पुरविली, होते बळ म्हणून सत्वाची
व्रते,वैकल्पे नियमित केले होती न साथ माझी,
त्याचेच फळ लाभे प्रपंचि, होणार तृप्ति माझी.
आज वाटे
सार्थ झाले ना कशाची कमी,
प्रेम
दिधले आजवरी ते असो उद्याची हमी,
संवाद
आपुला पूर्ण झाला तुझ्या मौन धरणेंनी,
आता
डोळ्यात वाचण्याचा छंद पुरा मनोमनी
पोरं झाली चाळीसीची वाट त्यांची न्यारी,
हृदयात गर्व वसतो, बघताची कर्तबगारी
दिलीस त्यांना घुटी अशी विद्वान केले तवसम
मोल त्यांनी जाणिले, सत्कृत्याचे अभ्यासीला सत्संग.
खूपच छान,,👌👌
ReplyDelete