Bruhat Parashar Hora Shastra , shrushti kram adhyay .
सृष्टीक्रम कथन अध्यायात सर्वव्यापी, सगुण तसेच निर्गुण विष्णूच्या तीन शक्ती आहेत त्याम्ह्णजे सत्व ,रज,तम् . सत्व शक्ती प्रधान श्रीशक्ती , रज शक्ती प्रधान भुशक्ती व तम् शक्ती प्रधान अंधकारमय नील शक्ती आहे. ह्या तीन शक्ती संकर्षण, प्रद्युम्न, आणि अनिरुद्ध ह्या नावाने आहेत. तम् शक्तीने संकर्षण, रज शक्तीमुळे प्रद्युम्न, तसेच सत्व शक्तीचे अनिरुद्ध असे आहेत.
संकर्षणामुळे महातत्वाची, अनिरुद्धमुळे ब्राह्मची आणि प्रद्युम्नमुळे अहंकाराची निर्मिती झाली.
हा अहंकार जास्त महत्वाचा आहे, जेव्हा अहं ची निर्मिती होते तेव्हांच सृष्टीतील, सत्व, रज तम् ह्या गुणांनाचा,तसेच ह्या तीन तत्वांचा आणि शंक्तींचा विचार केला जातो. म्हणजेच जसे हे त्रिगुण, त्रि शक्ती महत्वाच्या आहेत तेवढंच हे धारण करणारे शरीर . ज्याला आपण लग्न म्हणतो. ज्यातून ' मी' पण कळतं. मीपणा , अहं हा जीव निर्मितीचा अविभाज्य घटक आहे.
ह्याच अहंकाराचे तीन भेद आहेत,
सात्विक, राजस आणि तामस.
सात्विक अहंकारातून देवतांची निर्मिती होते.
राजसी अहंकारातून इंद्रिय बनले,
आणि तामसी अहंकाराने पंचमहाभूते तयार झालीत.
आपले शरीरही पंचहाभूतांनी बनलेले आहे हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. तर ह्या पंचमहाभूते व सचेतन इंद्रिय, आणि देवता म्हणजे आत्मा एकत्र येऊन जीवाची निर्मिती होते.
प्रत्येक प्राण्यांध्ये जीवात्मा व परमात्मा ह्यांचे अंश कमीजास्त प्रमाणात असतात. ज्या ठिकाणी किंव्हा ज्या पिंडात सात्विक अहंकार जास्त त्याच्यात परमात्माअंश जास्त असतात, आणि ज्या पिंडात राजस अहंकार असतो तो जीवंश असतो. त्यानुसार सुर्यादी ग्रहांमध्ये, त्रिदेवान मध्ये, त्रिशक्तींमध्ये परमतमांश जास्त असल्यामुळे ते परमात्मा आहेत. बाकीच्या ठायी जिवाशची मात्र बहुमूल्य असल्यामुळे ते जीव आहेत.
पुरुष व प्रकृती च्या मिलनाने जीवसृष्टी तयार होते . संख्याशास्त्रात ह्या दोहोंचाच उल्लेख सृष्टीनिर्मिती साठी केलाय. पुरुष म्हणजे केवळ चेतना, पण जो पर्यंत ह्या चेतनेला शरीर, मन आणि इंद्रियांची जोड मिळत नाही तोपर्यंत ही चेतना काहीच करू शकत नाही. चेतना वा वासनांच्या पूर्तीहेतु शरीर, मन आणि इंद्रिय म्हणजेच प्रकृती महत्वाची ठरते. प्रकृतीही तीन गुणांची आहे सत्व,रज आणि तम्,ह्या तीन गुणांच्या आधारावर जीव सुख दुःख भोगतो.
म्हणूनच कुंडलीत लग्न म्हणजे शरीर, लग्नेश म्हणजे हे शरीर कोणच्या प्रकृती चे आहे, चंद्र म्हणजे वासना, चेतना म्हणजेच मन आणि सूर्य म्हणजे आत्मा म्हणत्वचे ठरते. ह्या चारही गोष्टींवरून कुंडलीचा दर्जा ठरवतात.
ज्योतिशचार्या
स्नेहल जरुळकर
🙏🏻
Comments
Post a Comment