गुरुच्या राशीतला राहू आणि शुक्राच्या राशीतला राहू

गुरुच्या राशीत राहू आणी शुक्राच्या राशीत राहू

राहू हा अतिशय रहस्यपूर्ण, मायावी, गुप्त ता असणारा  ग्रह आहे.  संस्कृत मध्ये धातू ‘र:’ म्हणजे लपून ठेवणे. त्यापासूनच राहू ने नाम तयार होतो. तर रहस्य, माया, भ्रम, गुपित, आभासी जग ह्याचा कारक असणारा राहू, दोन नैसर्गिक शुभ ग्रहाच्या राशीत कसा फळेल?,  तो कोणच्या पद्धतीचे फळ म्हणजे गुरु जे देवातांचे गुरु आणि शुक्राचार्य जे दैत्यांचे गुरु ह्यांदोघांच्या राशींना देईल? दोघंही गुरु पदी असल्यामुळे नैसर्गिक शुभता गुरु व शुक्रात आहे. त्यामुळे जीवनातील सुखाची, आनंदाची जवाबदारी ह्या ग्रहांवर येते. गुरु आत्मिक आनंद तर शुक्र भौतिक आनंद देणारा.  गुरु पूर्णपणे सात्विक तर शुक्र पूर्णपणे राजसि.  आणि अत्यंत गूढ आणि समजण्यास कठीण असणारा तामसी ग्रह राहू. जो सात्विकतेचे सोंग घेऊन म्हणजे तो दैत्य असून देवातांचे सोंग घेऊन अमृत प्रशान करण्यासाठी देवतांमध्ये त्यातही दोन प्रकाशित देवातांमध्ये म्हणजे चंद्र व रवी ह्याचा मध्ये जाऊन बसला. म्हणजे स्वतःच्या मायेवर आणि स्वतःवर किती आत्मविश्वास असेल. खर तर आत्मविश्स्वासाचा कारक राहुलाही म्हंटले पाहिजे अस मला वाटत.

ज्योतिष शास्त्रात राहू हा स्वर्भानू दैत्याचे शीर आणि केतू म्हणजे धड. शीर म्हणजे त्यात पाच ज्ञानिंद्रिये येतात डोळे, कान, नाक, रसांना आणि त्वचा ज्यामुळे आपण बाह्य जगाचा उपभोग घेऊ शकतो. म्हणूनच भोगाचा कारक राहू तर मोक्षाचा केतू. राहू मुख तर केतू कडे पोट आहे , मुखाला तृप्ती, समाधान माहित नाही. पण पोट भरत, बाकी शरीर थकत, धडाला असणाऱ्या सर्व अवयवांची वासना म्हणजे इच्छा तृप्ती होते म्हणून केतू ह्याला ज्योतिष शास्त्रात मोक्षाचा कारक म्हणतात. राहू उपभोग घेतो तेंव्हा केतू मोक्ष देतो. म्हणजे केतूची ऊर्जा राहूच आहे.

काम, क्रोध, मद, मोह, लोभ आणि मत्सर ह्या शढरुपू मध्ये गुंतवून ठेवायचे काम राहू केतूचे आहे. राहू आयुष्याचे ध्येय दाखवतो आवडो या न आवडो, केतू पूर्व जन्मीचे कर्म दाखवतो. ध्येय गाठण्याची महत्वकांशा राहू देतो. म्हणजे तो महत्वकांशेचा कारक आहे. येन केन प्रकरेन , साम दाम दंड भेद काहीही वापरून जे हवे ते मिळावणारा , कोणच्याही गोष्टी ची परवा न करता, बांधणांना झुगरून, स्वातंत्र वृत्तीचा , चौकटीच्या बाहेर विचार असणारा, आणी अतिशय बलवान राहू आपले ध्येय गाठाण्यासाठी सर्व सीमा ओलांडू शकतो.

म्हणून ‘पर’ पासून तयार होणाऱ्या सर्व शब्दांचा कारक राहूच आहे. परदेश, परराष्ट्र, ह्याप्रमाणे.

ज्योतिष शास्त्रात रवी, गुरु आणि राहू ह्यांना अतिशय बुद्धिमत्ता असणारे ग्रह मानले आहे.

राहू व केतू छाया ग्रह  असल्यामुळे त्यांच्या कडे कोणच्याही राशींचे स्वामित्व येत नाही. पण बृहत परशार होराशास्त्रात दशाक्रमात राहूची महादशा असल्यामुळे दशाफळ अध्ययात श्लोक क्र. 34, 35, 36 मध्ये राहूची उच्च रास वृषभ, मूल त्रिकोण रास मिथुन, आणि स्वगृह कुंभ रास सांगितली आहे. त्या काळी सुद्धा राहूच्या स्वग्रुहा बद्दल मतमातंतर असावीत म्हणून “कन्या-मीनौ च केनचित” असे परशार म्हणतात.

अर्थात राहूची रास कन्या आणि केतूची मिन.

 पाराशर् म्हणतात उच्च राशीत म्हणजे वृषभ जी शुक्राची रास आहे त्यात राहू असल्यास त्याच्या दशेत जाताकाला धन- धान्याचे सुख , राजा व मित्र ह्यांच्या सहाय्याने सवारी लाभते, नवीन गृह निर्माण – पुत्रप्राप्ती – धर्मबुद्धी – विदेशात राजाकडून सन्मान ,धन आणि वस्त्रादी चा लाभ होतो. राहू तामसी , पापग्रह असूनही वृषभ राशीत राहूची उत्तम फळे सांगितली आहेत.

राहू पाप ग्रह असल्यामुळे आपण सदैव त्याला अनिष्टकरक मानतो पण तो कर्क वृषचिक, कन्या , धनु,  राशीत त्याच्या दशेत राजसन्मान, वास्त्र, वाहन आभूषण, व्यापारात वृद्धि, पश्चिम दिशेला यात्रा ह्या प्रमाणे शुभही ठरतो.

राहू केतू हे छाया ग्रह असल्यामुळे मुख्य सात ग्रहांना जशे राशींचे स्वामित्व दिले गेले तसे ह्या दोन ग्रहांना दिलेले नाही. दशक्रमात राहुकेतू ची दशा येते म्हणून केवळ दशाफळ अध्ययात त्याची उच्च रास, मूलत्रिकोन् , स्वगृह बद्दल चर्चा आढळते. त्यामुळे हे ग्रह ज्या ग्रहान् च्या युतीत असतात त्यांचे ते प्रतिनिधित्व करतात आणि त्या ग्रहांच्या गुणधर्मात तिव्रता आणतात.

राहुकेतू ज्या राशीत असतील त्या राशींच्या स्वामीं प्रमाणे फलतात.

राहू हा अति शक्तीवर्धक असल्यामुळे ज्या राशीत राहू असतो त्या च्या स्वामीच्या कारकत्वात वृद्धी करतो.

राहू हा अतिशय बुद्धिमान ग्रह आहे. तसाचं तो आधुनिकतेचा ही कारक आहे. चालू काळाची गरज ओळखून त्याचा फायदा राहू प्रधान लोक करून घेतात.

वायुतात्वाचा असल्यामुळ  शनी प्रमाणे सर्वव्यापी, सर्वस्पर्शी अगदी अध्यात्मिक ते भौतिक (आधुनिक), खेळापासून ते संशोधनापर्यंत, कला असो वा कायदा, लॉजिक ते कल्पकता सर्व विषयात खोल जाण्याची त्याची तयारी असते. मनापेक्षा बुद्धीचा वापर करणारा राहू अतिशय intellactual असतात. आकलन शक्ती जोरदार असते , त्यामुळे सर्व कन्सेप्ट्स क्लिअर असतात. हेच गुण गुरु मध्ये देखील ओतप्रोत् आहेत, फक्त आधुनिकते पेक्षा अध्यात्मिकता जास्त आणि धार्मिक जास्त आहेत.

राहूच्या नक्षत्रांचा विचार केल्यास त्याचे तीनही नक्षत्र गुरु आणि शनीच्या चरणांनी व्यापलेले दिसते. तीनही नक्षत्रांचे चरण स्वामी गुरु , शनी, शनी, गुरु असेच आहेत. म्हणजे सर्वव्यापी आकाशतत्व आणि सर्वस्पर्शी वायुतात्वाची सांगड राहूत दिसते.

शुक्राच्या वृषभ राशीत राहू कसा फळतो हे आपण वर बघितले. गुरुच्या राशीत अध्यात्मिकता गुरु सात्विक असल्यामुळे तर शुक्राच्या राशीत आधुनिकता शुक्र राजशी असल्यामुळे राहू वाढवतो.

जसे उदारणार्थ डॉ. आनंदीबाई जोशी, ह्यांच्या जन्माच्या साली 31 मार्च 1865 मध्ये राहू तुळेत होता. रायू स्वतः वायू तत्वाचा असल्यामुळे वायू तत्वाच्या राशीतू उत्तम असतो. आनंदीबाई ह्या भारताच्या पहिल्या स्त्री डॉक्टर. त्या काळी स्त्री शिक्षण हाच मोठा गहन् विषय होता. आणि त्यांनी चक्क मिशनारी स्कूल मध्ये जाऊन मद पदवी हासील केली. राहू सीमा जाणत नाही. परंपरा ,संस्कार, देश, धर्म, जाती सर्वांच्या पलीकडे जाण्याची क्षमता ठेवतो. आणि सर्वांच्या पलीकडे जाऊन काहीतरी अद्वितीय करण्याची धुंद देतो. वृषभ आणि तुळ रास राहुल चांगल्याच भावतात, कारण वृषभ रास ही पृथ्वी तत्वाची आणि राहू हा आकाशीय पिंड नाही किंबहुना तो पिंडच नाही तो पृथ्वीचा छाया बिंदू आहे. आणि तुळ रास ही समान तत्वाची आहे. भावाना आणि बुद्धीचा हुशारीने तोल सांभाळणारी रास आहे.

राहू तुळ राशीत तुले च्या कारकत्वात तिव्रता आणते. राहू तसाही अति महत्वाकांशी ग्रह आहे. अमरत्व चा कारक.त्यामुळे डॉ. आनंदीबाईंचे नावं पहिल्या महिला डॉक्टर म्हणून अमर झाले.

तसेच त्याचे वाहन सिंह जो भूक लागल्या शिवाय शिकार करत नाही; 14व्या वर्षी आनंदीबाईंना पुत्र झाला आणि 10 महिन्यात वारला. त्यामुळे त्यांना डॉक्टरी शिकण्याची तीव्र इच्छा झाली.

तुळेतल्या राहूचे आणखीन एक उदाहरण विनायक दामोदर सावरकर. ह्यांना कोण नाही ओळखत?

राहू ची विचार करण्याची पद्धत नेहमी चौकटीच्या बाहेरची राहिली आहे.

शुक्राच्या राशीतील राहू स्त्री जातका च्या कुंडलित असेल आणि जर तो लग्न किंव्हा ,धन भावात आणि जाया स्थानात असेल तर ती स्त्री  सौंदर्यवती, आकर्षक आणि कामुक असते.

 तो जातक  पुरुष असेल तर त्याची विषय लालसा अतिशय असते, व्याभिचारी आणि आकर्षक असतो. त्याची काम वासना वयानुसार थंड होणारी असते. हेच निदान शुक्राच्या राशीतल्या राहू बद्दल केले जाते .

हे चुक आहे असे नाही पण मग स्वातंत्र वीर सावरकर, भीमसेन जोशी, रामकृष्ण परम्हन्स, ( वृषभेत राहू) ह्यांच्यात असेच गुण असायला हवे होते. पण राहूने त्यांच्या इतर गुणांना वाढवले. आणी अमर केले.

महत्वाचे असे की शुक्र हा ग्रह जल तत्वाचा असल्यामुळे भावनिक आहे. सौम्य आहे. .त्यामुळे राहू सारखा उग्र ग्रह जेंव्हा त्याच्या राशीत येती तेंव्हा त्याचे उग्रत्व कमी होते.

तसंच गुरुच्या राशीत राहू आपला उग्र पणा विसरतो आणी आत्मिक आनंदाच्या शोधात स्वतःला झोकून देतो.

गुरु चे कारकत्व ध्यान, ज्ञान, अध्यापन, सद्गुण, श्रेष्ठता, सर्वगीन आचार, वेद शास्त्र स्मृती ज्ञाता, सदगती, इंद्रीय निग्रह, धार्मिक अनुष्ठान, दैवता आणी ब्राह्मणानप्रती भक्ती गुरुच्या राशीतील राहू स्वतःच उग्रत्व विसरून ह्याच कारकत्वाची लालसा ) राहू चे कारकत्व) जातकात निर्माण करतो आणि

कीर्ती, प्रसिद्धी, सत्ता, अधिकार मान ( राहूचे कारकत्व) मिळवून देतो.  इथे गुरु पुर्न्पने सत्विक् ग्रह् आहे आणि अंगीच्या गुणांचा इतरांवर प्रभाव पडण्याची महत्वकांक्षा राहू देतो.

ज्या राशीत राहू असेल त्या रशिस्वामी च्या कारकत्वला वाढावण्याचे काम राहू करतो.

शुक्रा मध्ये आत्मिक आनंदा पेक्षा भौतिक आनंद घेण्याची वृत्ती आहे . शरीरिक ओढ, कामसुख, ज्याच्या मध्ये मनुष्य गुंतत जातो ते सर्व, सौंदर्य ( शरीरिक तसेच स्वभावाचे), सजावतीतील कलात्मकता , कल्पकता, गायन ,नृत्य, लेखन , कावित्व, सर्व कला, हावभाव, बांधेसूद अवयवं, ऐहीक् जीवना कडे ओढ , जीवनाचा भरपूर आस्वाद घेण्याची वृत्ती, सहवासाची ओढ( एकटेपणा आवडतं नाही), प्रेम ,प्रणय, वैवाहिक सुख, समर्पणाची भावना, भान विसरून समर्पण करणे, कुटुंब वत्सल् , कोणच्याही गोष्टीचा रस घेऊन आनंद घेणे हे सर्व शुक्राचे कारकत्व.  

फलदीपिका ग्रंथात भावेश दशा अध्ययात

‘राहू ज्या ग्रहाच्या युतीत असतो त्या ग्रहाचे गुण आणि दोष आपल्यात घेत असतो, म्हणजे त्या ग्रहा चे गुण आणि दोष वाढवण्याचे काम राहू करतो. शुभाशुभ ग्रहांच्या युतीची फळे त्या त्या शुभाशुभ ग्रहाच्या नुसार राहूच्या दशेत मिळतात. पुढे आचार्य म्हणतात जेव्हा शुभ ग्रहणे राहू युक्त होतो तेंव्हा तो ग्रह दशेच्या अंती विशेष कष्टप्रद होतो.

राहुकेतू शुभ भावात किंव्हा शुभ राशीत एकटे असता त्यांच्या दशेत ते शुभ फळ देणारे होतात.

फलदीपिका ग्रंथात भावानुसार राहूची फळे सांगितली आहेत :

लग्नात राहू असता जातक अल्पयू पण धनसंपन्न आणि बलसंपन्न असतो.

द्वितीय भावात राहू असणारा जातक प्रगल्भा वक्ता, कोमल मनाचा, सुखी आणि राजा द्वारे प्रदत्त धनाने धनी होणारा असतो.

तृतीय भावापासून अष्टम भावापर्यंत कोणच्याही भावात आणि व्यय भावातील राहू जातका साठी अनिष्ट, अशुभ च असतो.

नवम भावाचा राहू गण, ग्राम, पूर यांचा आधीपती बनवतो, आणि असा जातक अधिक पुण्यात्मा असतो. पण एक तो विरोधी प्रवृत्तीचा असतो.

दशम स्थानात राहू जातकाला विख्यात, इतरांच्याही कार्यात रुची घेणारा, निर्भय पण  सत्कर्मा नसतो.

लाभ स्थानात अल्प संतती देणारा कारण पंचमावर पूर्ण दृष्टी असल्यामुळे, पण धनवान् आणि चिरायू असतो.

गुरुची धनु रास ही अग्नी तत्वाची असल्यामुळे अग्नीचे सर्वोत्तम गुण ह्या राशीत आहेत. अग्नी हा ज्ञानाचा स्रोत आहे नव्हे अग्नी हा मूळत्: च ज्ञानी आहे आणी गुरु ज्ञानाचा कारक असल्यामुळे सदसादविवेकबुद्धी, ज्ञानी, नीतिमत्ता, न्यायी, तारतमय , शरिरिक् सुधारूढता, योग हटयोग, म्हणजे ज्ञानशक्ती आणी क्रियाशक्तीचा सुंदर संगम ह्या राशीत आढळतो . तसेच धनेचे आणी राहूचे काही समान कारकत्व आपल्याला लक्षात येतात, जसे महत्वकांक्षा, आशावाद् , अति आत्मविश्वास, धडाडी, दूरदृष्टी, ज्ञान मिळवाण्याची लालसा, शरीर सुदृढ ठेवण्याची लालसा,  विचारिक शुद्धता धनेत वाढवतो.

 आपल्या अंगीच्या गुणांचा इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी राहू महत्वाचा आहे. श्रीमती इंदिरा गांधी ह्यांच्या कुंडलित राहू धनु राशीत गुरु आणी शुक्राच्या परिवर्तंबयोगत आहे.  विद्वात्ता , निर्णय तात्परता, उत्साह, शरीरिक सुदृढता, अति महत्वाकांशी, धडाडी आगीतत्व असल्यामुळे, मानी, लहरी कारण द्विस्वभाव रास आहे, बेधडक, स्वतंत्र विचारांच असे धनुछे गुण आपल्याला माहीतच आहेत. ह्या राशीत हे गुण राहू आणखीन वाढवतो. इंद्रीय निग्रह , तप, सर्वांगीन विकास हे गुरुचे करक्त्व.

राहू ज्या ग्रहांसोबत असतो त्या ग्रहनचे गुण दोष तो आणखी प्रखर करतो. म्हणजे शुभाशुभ ग्रहांच्या युतीची फळे राहू त्या त्या शुभाशुभ ग्रहानुसार राहू आपल्या महादशेत देत असतो. (फलदीपिका भावेश दशा अध्याय)

राहू एकटा शुभ राशीत, शुभ स्थानात  असता त्यांच्या दशेत ते शुभ फळे देणारा होतो. राजा सारखे ऐश्वर्य, अभिष्ट कामांची सिद्धी, धनाची प्राप्ती आणि कीर्ती लाभते.

शंकर आडवाल ह्यांच्या पुस्तकात आक्रव्या  स्थानातील राहूची अत्यंत शुभ फळे दिली आहेत . 11व्य स्थानात राहू असता प्रसिद्धी, आरोग्य, धनी, श्रीमंत, आर्थिक फायदा, उत्तम आचरण आणि इच्छापूर्ती होते.

मीन ही जळतत्वाची स्त्री गुणधर्माची रास.

अगदी मृदू, निरहंकारी, हळवी, दयाभाव असणारी, कोणाच्याही मदतीस धावून जाणारी, परोकरी, उदारवृत्तीची, समाजात् काही चांगले बदल व्हावे म्हणून कष्ट उपासणारी,  समंजस पण खूप पापभिरू अशी रास आहे. जळततांची रास असल्यामुळे पूर्ण समर्पण करणे सहज जमत. भूत दया आणी निसर्गाची आवड ह्या राशीत बघायला मिळते teamwork खूप आवडतं. सर्वांना घेऊन चालणारी , पण अतिशय तत्वनिष्ठ. तस् तत्वनिष्ठा गुरुच्या दोन्ही राशीत ओत प्रोत मीन. धनु रास जास्त प्रॅक्टिकल असल्यामुळे भक्तीत वाहून जाणे हे तिच्यात नाही .त्या राशीला जे पटतं मग जगात काहीही होवो न ते च पूर्ण समर्पणाने करेल.   ह्या राशीत राहू असता हेच गुण वाढवून जगात नावं अमर करण्याचं काम राहू करतो . कारण तो अमरत्वाचा कारक आणे. समुद्रा मंथन झाल्यावर राहूच होता जो अमृताच्या अभिलाषेनी देवतान् मध्ये येऊन बसला होता . स्त्री रास असल्यामुळे कल्पनाशक्ती उत्तम असते मीन राशीत्.

राहू मीन राशीत ह्या सर्व गुणांमध्ये वाढ करून अमरतवाला नेण्याचे काम करतो, म्हणजेच कीर्तिवान करतो. ह्या राशीत राहू अध्यात्मिकता, वाढून इतरांवर छाप पडतो.

ह्याचे खूप छान उदाहरण म्हणजे ए, पी. जे. अब्दुल कलम. ते शास्त्रज्ञा असून भारताचे अकरावे राष्ट्रपती पद भूषवले. अत्यंत हुशार, चौकातीच्या बाहेर विचारकरण्याची पद्धत, , अप्रतिम कल्पनाशक्ती. अध्यक्रमिकता आणी आधुनिकतेचा सुंदर संगम अब्दुल कलम मध्ये दिसतो

ह्यांच्या कुंडलित मीनेचा राहू हर्षल सोबत नावाम स्थानात. म्हणजे उदित गोलर्धात,  राशी स्वामी गुरु लग्नात उच्छेचा. राहू आयुष्याचे ध्येय दाखवतो . ती पूर्ण करण्याची महत्वकांक्षा राहू देतो, दूरदृष्टी, अब्दुल कलम जे ही काम हातात घ्यायचे ते त्यात ते स्वतःला झोकून,  त्या कामांचा आनंद घेत पूर्ण करायचे.

आणखीन एक व्यक्तिमत्व म्हणजे  महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री यशवंतरओ चौहान. सौरक्षण मंत्री, अर्थ मंत्री, गृह मंत्री अशी उच्च पदे त्यांनी भुशवली आहेत. महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नावं अमर झाले . अमरत्व हे राहूचे कारकत्व आहे. म्हणूनच कीर्ती प्रसिद्धी राहूचे कारकत्वात येतात. तसंच पहिली स्त्री पंतप्रधान म्हणून कोणीही इंदिरा गांधीला विसरूच शकत नाही.

आताच उदाहरण घ्यायचे तर नरेंद्र मोदी. मीनेत राहू. गुरुच्या धन स्थानात म्हणजे गुरु राहू परिवर्तन योगात, कारण राहूची स्वागृह रास कुंभ आहे. मंगल राहूत आणी गुरुत केंद्र त्रिकोण योग होत आहे. त्यामुळे मंगळाची गुरुवर दृष्टीांनी राहूची मंगळावर दृष्टी. राहू बुधा मध्ये समसप्तक योग. त्यामुळे व्यवसाय , सौरक्षण, कायदे, ह्यात  राहू गुरु परीवर्तन् योगामुळे आणी गुरुच्या राशीतल्या राहू मुळे किती आणी कसे धाडसी निर्णय घेतलेत आपण सर्वेच जाणतो. इतके विराध समोर येऊन सुद्धा न दगमगता , कुठल्याही गोष्टीची भीड न बाळगता त्वरित निर्णय घेतलेत. मीनेच्या राहूत त्यागवृत्ती जास्त आहे.  मीन अथांग समुद्राचा कारक आहे  जिथून जेही ज्ञान मिळेल ते आत्मसात करणारी रास मीन  आणी धनु च्या राहूत प्रसिद्धीची अभिलाषा जास्त आहे, मान मिळणे, कर्तृत्व दाखवणे , धनाची अभिलाषा असणे, शौऱ्य , शिस्त हे धनु राशी चे कारकत्व आहे.

मीन आणी धनु ह्या राशीतला बेसिक फरक एवढाच की धनु रास जास्त प्रॅक्टिकल असल्यामुळे भक्तीत वाहून जाणे हे तिच्यात नाही .त्या राशीला जे पटतं मग जगात काहीही होवो न ते च पूर्ण समर्पणाने करेल. पण मीन राशीत तशीच आत्मसामर्पन्नाची भावाना जास्त आहे. कोणचाही काम पूर्ण जीव ओतून, टीमवर्क ने, प्रेमळ मार्गदर्शनाने करून घेईल आणी स्वतः सुद्धा त्यात गढून जाईल.

ह्यानंतर शुक्र ह्या दैत्यांच्या गुरु च्या राशीतील म्हणजे वृषभ आणी तुळ राशीतील राहूच्या आद्वितीय फळे पुढच्या शनिवारी बघू. आणी राहू बद्दलचे काही नियम ही बघू.

Comments

Popular posts from this blog

Third House in Astrology (तृतीय स्थान)

Muhurta for Travel

भगवंताशी हितगुज