मना चंदनाचे परी त्वां झिजवावे

मना चंदनाचे परी त्वा झिजवावे

ह्याचा अर्थ वेगळा सांगायची गरज नाही. इथे चंदनाच्या खोडाप्रमाणे आपले आयुष्य असावे , झिजले तरी कर्तृत्वाचा सुगंध मागे ठेवायचा असतो.
हा तर केवळ झाडाच्या तोडलेल्या खोडाचा विचार समोर ठेवला गेला. ह्या झाडाची जीवन यात्राही माणसाला खूप शिकवून जाते. 
हा वृक्ष स्वच्छ जागी छान बहरलाय अस कधीच दिसणार नाही. खरं तर हे झाड एकटे कधीच जगू शकत नाही. ह्याच्या रोपा सोबत याला आपल्या अनेक सवंगड्याची साथ लागते. रानातील झाडे, झुडपे, गवत ह्यांची साथ घेऊनच ते मोठे होते. सर्वांची साथ घेऊनच ह्याचा सुंदर डौलदार वृक्ष तयार होतो. ह्या झाडाची लागवड करणाऱ्याला ह्याच्या सवंगाड्यांनाही मान देणे आवश्यक होते. कारण आपल्या सवंगाड्यां शिवाय हा वृक्ष जगूच शकत नाही. हेच त्या वृक्षाचे त्याच्या छोट्या मोठ्या सवंगड्यावरील प्रेम. मग ह्याचे गंध देवांना कसे आवडणार नाही.
चंदना प्रमाणे आपले कर्तृत्व असावे, आणि त्याच्या प्रमाणेच वाढावे. 
स्नेहल जरुळकर

Comments

Popular posts from this blog

47th Wedding anniversary poem

गजरा

Third House in Astrology (तृतीय स्थान)