वार क्रम
तुम्ही कधी विचार केला आहे का की वाराचा क्रम रविवार , सोमवार मंगळवार, बुधवार गुरुवार, शुक्रवार , शनिवार असाच का असावा. 24 तासाचा एक दिवस असतो, सूर्य उगवल्यापासून पुन्हा तोदिवशी वी पर्यंतचा काळ म्हणजे वार किंवा वासर. रविवार ते शनिवार असा एक आठवडा असतो. 24 तासाचा एक दिवस 24 तास म्हणजे साठ घटका.दर तासाला आकाशातील ग्रहांचे पृथ्वीशी होणारे अंशात्मक अंतर बदलते याला होरा ⌛ असेही म्हणतात. होरा म्हणजे तास. खरा शब्द अहोरात्र यापासून होरा शब्द निर्माण झाला. अहोरात्र म्हणजे 24 तास. गणितामध्ये भाग पडल्याशिवाय गणित व्यवस्थित सुटत नाही. जसे तासाचे मिनिटे ,मिनिटाचे सेकंद. तसाच अहोरात्र म्हणजे 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र. ह्यालाच अहोरात्र म्हणतात. त्यातील एक एक तासाचा विचार करण्यासाठी सुरवातीचा ,' अ' आणि शेवटचा 'त्र ' हे काढून् उरणारा शब्द 'होरा' हा प्रत्येक तासासाठी वापरतात.
दिवसाचा प्रत्येक होरा विशिष्ट ग्रहाला दिला आहे. म्हणजे प्रत्येक होरा वर ग्रहांचा अंमल आहे.
प्रत्येक ग्रहा च्या होराचा विशिष्ट क्रम आहे. मंद गती ग्रहापासून जलद गतीच्या ग्रहा पर्यंत .
किंवा लांबच्या ग्रहापासून जवळच्या ग्रहा पर्यंत अस क्रम ठरलेला आहे. शनी नंतर गुरु, मग मंगळ मग रवी मग शुक्र मग बुध मग चंद्र, मग परत शनी, गुरु, मंगळ .
आपला भारतीय वार रात्री 12ल बदलत नसून सूर्योदयाला बदलतो. कारण प्रत्येक तासाला आकाशातील ग्रहांचे होरे म्हणजे पृथ्वीशी होणारे अंशात्मक अंतर बदलते व त्याचा परिणाम पृथ्विवरील घडामोडीनवर होतो. सूर्योदयाच्या वेळी ज्या ग्रहाचा होरा असतो त्याचा तो वार असतो. त्याला वारधीपती, वारेश असे संबोधतात.
उदरणार्थ ज्या दिवशी पहिला होरा शनीचा असे धरल त्र त्यावेळी सूर्योदयापासून शनिवार सुरु झाला. आता शनी चा पाहिला होरा/तास झाल्यावर दुसरा होरा गुरु चा , तिसरा मंगळचा चौथा रवीचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा आणि सातवा चंद्राचा असे सात तास /होरे झाल्यावर ह्याच क्रमाने 25तास् मोजले असता पंचवीसावा होरा रवीचा येतो म्हणजे रविवार सुरु होतो. परत रवी पासून शुक्र, बुध, चंद्र, शनी, गुरु, मंगळ हे सात होरे झाले मग आठवा परत रवीचा, मग शुक्र, बुध पुढे क्रमाने मोजल्यास चौदावा मंगळाचा, परत पंधरावा रवी , सोळावा शुक्र, सतरावा बुध, अठरावा चंद्र, एकोणवीसावा शनी, विसावा गुरु, एकवीसावा मंगळ, बावीसावा रवी, तेवीसावा शुक्र चौवीसावा बुध आणि मग पंचविसावा तास / होरा चंद्रा चा म्हणून सोमवार. मग परत चंद्रपासून ह्याच क्रमाने चौवीस होरे मोजावे पंचविसावा मंगळाचा मंगळवार राहील.
कोष्टक खाली देत आहे. मोजून बघा लक्ष्यात येईल.
असा प्रत्येक पंचविषयव्या होराचा अधीपती त्या त्या दिवशीचा वारेश, वारधीपती झाला. आणि आठवड्यातील वाराचा क्रम रविवार ते शनिवार असा ठरला.
ह्या होराचे सुद्धा खास महत्व आहे, सूर्याच्या होऱ्यात राजसेवा करावी,
शुक्राच्या होऱ्यात प्रवास ,
बुधाच्या होऱ्यात ज्ञान प्राप्त करावे,
चंद्राचा होरा सर्वच कामांसाठी चांगला,
शनीचा द्रव्य संग्रह करावे,
गुरूंचा शुभ कार्यास चांगला,
मंगळाचा, स्पर्धा, वाढविवाद युद्धास चांगला .
जे कार्य करायचे आहे त्या साठी असणाऱ्या ग्रहाचा होरा असता कार्य लवकर यशस्वी रित्या पार पडते. असा अनुभव आहे.
शनीच्या होऱ्यात प्रवासाला सुरुवात केल्यास नियोजित जागी जाण्यास विलंब लागतो. आजकाल होरा बघून काम करणे तर शक्य नाही पण प्रयत्न करायला हरकत नाही कारण एका ग्रहाचे तीन होरे तरी आपल्याला मिळतात.

Comments
Post a Comment