पुढील वाट

पुढली वाट

व्रुद्ध होता दिसे सामोरी
         दिवस संपण्याचे
येथवरी येता रेटले
         गाडे संसाराचे

पुर्ण करण्या अपेक्षा झगडलो दमलो
          सरले बळ अंगाचे
आता न होयी पायपिट
          ओझे झाले देहाचे


भव्य घराच्या कोपराशी
           जडले नाते सख्ख्याचे
उचंबळी उरी तरुण भावना
           सुरेल शब्द अधराचे


कुणी यावे निकट बसावे
       करावे देणेघेणे शब्दांचे
व्रुद्धत्व जाई विसरल्या
     मिळता सोबती जीव्हाळ्याचे


जन्म जोवरी होता भूवरी
      जोडले आप्त मित्र चव्हेरी
हिच पुंजी वाटे उर्जा
     भागविण्या मम गरजा

आता कशाची न करणे आशा
   तुडविले रान सुख दु:खाचे
आता सरसावे कात टाकण्या
   पांग फेडण्या आयुष्याचे


झोळी आठवणिची सोडुनि जाता
     मागे वळाया नको
दुर दिशांनाही नसे अंत     मावळण्या मिळे खुला आसमंत
               बाळ लोखंडे़़़़़़़़़़

Comments

Popular posts from this blog

47th Wedding anniversary poem

गजरा

Third House in Astrology (तृतीय स्थान)