आजोबा

कष्ट केले रात्रंदिवी, दिवस करुन रात्रीचा
हेलावते ह्रुदय स्मरता, भुतकाळ तो सुगिचा
देह थकला, कणा वाकला, सुटे कंप हाताला
झोप येइना थारा मनी, नाना विचाराला़़़़़़़़़़़़़़़

नातवांशी खेळ खेळता, ना तुम्हाला थकवा
खेळण्यात दंग होता, विसरता रुसवाफुुगवा
शब्द बोबडे बोळक्यातले, जागवी   शिशुत्वाला
किलकिलाट तो नातवांचा, ऐकु येइना कानाला़़़़़़़़़़़़़़़़़

पुरे खेळणे आबा तुमचे, नसे तुम्हा घोर
जनक जननिचे रागे भरणे, वर बुक्क्यांचा मार
दिवसभराचे चरणे तुमचे, होतो त्रास पचनाचा
झोप आमची किरकिर करते, भंग होतो शांतीचा़़़़़़़़़़़़़़़़़

झोपा आता आबा तुन्ही, अर्धी रात्र ढळली
नका देऊ ठसका खोकला, गिळून घ्या उबाळी
शिंकुनशिंकुन नाकपुडी बुजली, नको बुजाया दुजी
होऊ उद्याला सज्ज खेळण्या, करु धमाल कमालिची़़़़़़़़़़़़़़
                    बाळ लोखंडे

Comments

Popular posts from this blog

47th Wedding anniversary poem

गजरा

Third House in Astrology (तृतीय स्थान)