उगवते तारे
उमलते तारे
राहुल त्याच्या सत्काराचा कार्यक्रम मधूनच टाकून लगबगीने दवाखान्यात पोचला, नर्सने संगितले तुमचीच आठवण करताहेत, आल्या वेगापेक्षाही अधिक वेगाने तो आईचे रूम मध्ये दाखल झाला. आई निपचीत पडून होती, राहुल तिच्या पायथ्याशी जाऊन उभा राहिला व आईकडे बघत राहिला. तिचे डोळे अर्धवट उघडे व तोंडांनी काहीतरी पुटपुटत असल्याचे त्याने पाहिले. येताना त्याने तिच्यासाठी डाळिंबाचा ज्यूस आणला होता तिच्या उषाशी बसून त्याने आपला एक हात आईच्या कपाळावर ठेवून तिच्या तोंडात टाकला घोटभर कासातरी तिने गिळला असेल, तिला खूप बोलायचे होते. तिने बोलण्याचा प्रयत्न केला पण तिचे ओठच शिवल्या गेले, तोंडातून शब्दही बाहेर पडला नाही. एक नजर राहुलवर टाकून तिने मान टाकली. डॉक्टर...त्याने मोठयाने हाक मारली. डॉक्टर व नर्स दोघे आले, तपासून झाल्यावर त्यांनी तिचे संपूर्ण शरीर चादरीने झाकले, व राहुलचा खांदा दाबून संगितले तुमची आई शांततेने तुम्हाला सोडून गेली व ते दोघे रूमच्या बाहेर पडले. तो निश्चल दगडासारखा उभा होता तेवढ्यात संजय त्याचा मोठा भाऊ त्याला राहुलचा फोन गेला तसाच दवाखान्याच्या दिशेने निघालेला खोलीत येऊन पोचला. आईचे संपूर्ण शरीर झाकलेले बघून राहुलच्या खांद्यावर त्याने हात ठेवताच राहुलने तो येई पर्यन्त रोखून ठेवलेला हुंदका बाहेर पडला व आईच्या अंगावर पडून त्याने टाहो फोडला. संजयलाही आसू आवरनासे झाले पण थोरला भाऊचे नात्याने त्याने राहुलला सावरले, दोघे एकमेकाच्या गळ्यात पडून ओक्साबोक्षी रडायला लागले.
आपल्या डोळ्यातून पडणार्या प्रत्येक टिपामध्ये राहुलला आईचे रूप दिसत होते. वडिलांचे छत्र बालपणीच हरवल्याने आई शिवाय त्या दोघा भावांच्या मागे कुणी नव्हते. वडील व आई दोघेही अभिनयपटू म्हणून ख्याति असलेले व एकत्र नाटकात काम करीत असत. रंगमंचावर ते एकत्र दिसताच त्यांच्या चहत्याकडून टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले जायचे. इतकेच नव्हेतर कोणत्याही प्रयोगाला ते जात तेव्हा मधल्या स्टेशनवर चाहत्यांकडून सत्कार व्हायचा. दिवाकर व सविता ह्यांचे छायाचित्र नाटकाच्या जाहिरातीवर जरी झळकले तरी नाटकाचा प्रयोग हाऊस-फुल्ल व्हायचा. त्यांच्या संवादाची फेक, त्यांचा आवाज ऐकण्यासाठी प्रेक्षकांचे कान आसुसलेले असायचे . सविता तर सौंदर्याची खाणच होती व दिवाकर चांगला गोरापान, धष्ट्पुष्ट , उंचपुरा असल्याने प्रयोगाला बहार यायची .
सविता दोन मुलांची आई झाली व पोक्त दिसायला लागली असल्याने आता तिला नयीकेचे पात्र मिळेनासे झाल्याने तिच्या अंगच्या गुणांना ओहटीच लागली होती व दिवाकर सविता जोडी पुढे पडद्याआड गेली. दिवाकरचे सोबत काम करण्याला नयीकेचे भूमिकेत चंचलने प्रवेश केला. ती सुद्धा लावण्यावतीच होती व प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली. वारंवार तिच्या सानिध्यात आल्याने दिवाकर तिच्याकडे ओढल्या गेला व तिचा होऊन बसला. चंचलने त्याला पुरता आपल्या जाळ्यात चांगलेच अडकविले.त्यांची ताटातुट होण्याला चंचल यशस्वी झाली. चंचनला जशी जशी प्रसिद्धी मिळू लागली ती अहमभावी झाली, व तिने दुसर्याच नटा सोबत सलगी केली आणि ती दिवाकरला सोडून निघून गेली. त्या विरहाने दिवाकरला मदिरेने जवळ केले. प्रकृती क्षीण झाली तशी नाट्य क्षेत्रात त्याला उतरती कळा आली. सविता व दोन मुलांना सोडून बरेच वर्षे झाल्याने तो एकटा कसेतरी दिवस काढीत होता.
सविता आपल्या दोन मुलांना घेऊन दिवस कंठीत होतीच, गाठीशी असलेली पुंजी किती दिवस पुरणार. त्या तिघांवर उपासमारीची पाळी आली. एका मोडक्या चाळीत राहत होती. तेथे शेजारच्या सुमित्राबाईंचा एकमेव आधार तो होता. एका अत्युचं शिखरावर पोचलेली नटीवर असे दिवस यावेत हे चाळीतल्या लोकांचा कुतुहलाचा व चर्चेचा विषय होता.
राहुल तर अवघा पाच वर्षाचा व सजय सात वर्षाचा दोघे एवढे लहान होते, दोघेही सविताचे आश्रितच होते. हालाकीच्या परिस्थितीने दोघांनाही शहाणे व समंजस केले होते. त्या लहान वयात त्यांना आर्थिक सहाय्य करणे शक्यच नव्हते. सविताचा एकच मंत्र होता ती मुलांना म्हणायची देवच आपल्याला तारील. तिने सुमित्राबाईंच्या सल्ल्या प्रमाणे घरगुती मसाले, चटण्या बनविण्याचा घरगुती व्यवसाय सुरू केला गाठी आसलेल्या पैशातून एक कांडण यंत्र घरी आणले पण त्या व्यवसायातून मिळणार्या पैशालतून फक्त पोट भरण्या इतकीच प्राप्ती व्हायची.
एक दिवस संजय बाहेर पडला व चार घरी जाऊन काम मिळते का बघत होता, त्याच्या वयाकडे बघून त्याला नकारघंटाच ऐकायला मिळाली, त्याचे लक्ष एका रस्तल्यावर विजेच्या खांबाचा आधार घेऊन पडलेली व्यक्ति दिसली, त्याचे पाय तिकडे ओढल्या गेले, प्रथम दर्शनी त्याला ती व्यक्ति ओळखता आली नाही पण निरखून बघितले तेव्हा असहाय अवस्थेत पडलेले व मुखातून सविता सविता जप त्यांचा चालला होता. हे आपले वडील दिवाकर त्याने ताडले बरेच वर्षे उलटूनही पित्याची अशा दयनीय स्थितीत गाठ पडली व त्याचे मन हेलावले, त्याने त्यांना घरी आणले. बापाच्या घरात येण्याने अजून एक डोके उपासमारीत भारती झाले होते. सविताला काही सुचेना तिने मुलानेच बापाला घरी आणले म्हणून व मागचे सगळे विसरून तिने दिवाकरला थारा दिला. दिवाकरची प्रकृती खूपच क्षीण व दयनीय होती, त्याचवेळी तो अल्प काळचाच सोबती आहे ह्याची जाणीव तिला झाली. सविताकडे बघताना मात्र त्याच्या नजरेतले अपराधी असल्याचे भाव तिने बघितले. सविता मी गुन्हेगार आहे व मिच तुझ्या ह्या अवस्थेला करणीभूत आहे म्हटले पण पुढे त्याचे तोंडून शब्द बाहेर पडेनात, दिवाकरने क्षमा याचनेसाठी तिच्या पायावर डोके ठेऊन अखेरचा श्वास घेतला.
सविताला मात्र प्राप्त परीस्थितीतून सुटका नव्हती, देवावरचा विश्वास तिला बळ देत होता पण कष्ट करताना प्रकृतीने साथ द्यायला हवी ना, तीन चार वर्षे व्यवसायाने तिला साथ दिली आता प्राप्ती सुद्धा हवी तशी होत नव्हती, जवळजवळ तो व्यवसाय बंदच पडला. चटणी, मसल्यासाठी आणलेले कांडण यंत्र तिला विकावे लागले. ती पूर्णतया निराश्रित होऊन बसली.
संजय आता चावदा वर्षाचा झाला होता व त्याने वर्तमानपत्रे विकण्याचा मार्ग पत्करला होता, संजयच्या कमायीतून जेमतेम दोन वेळचे अन्न पोटात पडत होते तरी सुद्धा राहुलला मोठे करण्याचे संजयचे स्वप्न होते. संजय कामाला लागला व आपण काहीच करीत नाही ह्याच विचारात राहुल असायचा.
एकदा आळीतल्या गणपति उत्सवात राहुलने सुदामाची भूमिका केली होती व अंगच्या फाटक्या कपड्यातून सुदामा जीवंत केला होता. त्याच्या अभिनय कौशल्याने संजयचे वेगळेच विचारचक्र सुरू झाले व राहुलला नाट्य क्षेत्रात नक्कीच यश मिळेल हे आईला त्याने बोलून दाखविले तेव्हा तिला तिचे दिग्दर्शक राजाभाऊंची आठवण झाली. राहुलला ते नक्कीच स्वीकारतील तिला वाटू लागले. संजय व राहुल दोघे राजभावूकडे गेले. त्यांना आपण सविताची मुलं असल्याचे संगितले, पण रोज नवीन नवीन नटयांच्या राजाभाऊ संपर्कात असल्याने पडद्यामागे गेलेली सविता ते विसरले होते, संजयने दिवाकर सविता नावे उच्चारिता त्यांची ती दरिद्री अवस्था बघून ते विस्मयाने त्यांचाकडे बघत राहिले. संजायला येण्याचे प्रयोजन काय ते विचारले, राहुलसाठी एखादी बालकलाकाराची भूमिका द्यावी व आपल्या पदरी ठेवावे संजयने विंनम्रतेने विनविले. त्यांच्या फाटक्या राहणीमानाकडे बघून त्यांनी नाक मुरडले खरे पण राजाभाऊला राहुलच्या डोळ्यात विलक्षण चमक दिसली, त्यांनी हाती घेतलेल्या ‘उमलते तारे’ नाटकासाठी राहुल बाल कलाकारच्या भूमिकेला शोभतो म्हणून तो कितपत परीक्षेत उतरतो बघण्यासाठी त्याला ठेऊन घेतले.
संजयला राहुल राजाभाऊंच्या नजरेत भरला व आपण एक गड जिंकला हे सांगण्यासाठी कधी आईला भेटतो असे त्याला झाले. घरात येताच आ...ई मोठयाने ओरडून त्याने घडलेली हकिगत सांगितली. सविताने देवाला नमस्कार करून राजा भाऊंचे आभार मानले. संजयने मी अजून दोन कामे जास्ती करीन पण राहुलला मोठा कलाकार करीन म्हणून आश्वासिले.
राजाभाऊ छोटी मोठी कामे राहुलकडून करून घेताना तो कसा वागतो, बोलतो, कसा चालतो,हयाकडे त्यांचे बारीक लक्ष असायचे. त्याची काम करण्याची शैली व दुसर्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याची ती लकब व हुशारी राजाभाउच्या नजरेतून सुटली नाही. व्यवहार म्हटला की माणूस हात ढिला सोडत नसतो. राजाभाऊंना राहुल म्हणजे विना वेतनाने काम करणारा यंत्रमानव वाटला काही दिवस रित्या हातानेच ते त्याला घरी पाठवत.
राहुल तसा प्रकृतींनी सडपातळ व नाजुक होता, कामाची सवय नसल्याने थकून जायचा. संजय त्याला धीर देऊन म्हणायचा तू नक्कीच जिंकशील थोडी कळ सोस मोठ्या भावाने दिलेल्या धीराने व तो पाठीशी असल्याने तो प्रोत्साहित होत असे. दिवसभरच्या कामाने थकून जायचं, आईच्या कुशीत शिरायचे व आईचा हात धरून त्याला केव्हा झोप लागायची कळेना. सकाळी उगवता सूर्याचे कोवळी किरणे सर्वांगावर पडली की तो ऊर्जित व्हायचा.
एक दिवस फावल्या वेळात स्टुडिओत त्याला अंगविक्षेप करताना राजाभाऊने बघितले व तेव्हाच त्याच अवस्थेत त्याला समोर उभे करून त्याने केलेला अभिनय व केलेले नृत्य करण्यास लावले. राहुलने मोठ्या आत्मविश्वासाने व ताकतीने ते नृत्य केले करीत असताना राजाभाऊंना त्याने नृत्यात केलेला अभिनय, डोळ्यांच्या हालचाली बघून हवा त्यांना असलेला कलाकार शोधण्याचे कष्टच पडले नाही. वाहवा म्हणून त्यांनी त्याची पाठ थोपटली व लेगेच शंभर रुपयाची नोट त्याचे हातात ठेऊन त्याला ‘उमलते तारे’ साठी करारबद्ध केले.
पैसे हातात पडताच तो धावत घरी पोचला, त्याने त्याच्या पहिल्या मिळकतीचे पैसे आईचे हातात दिले. पोरचे यश बघून तिने देवाला हात जोडले. संजय घरी येण्याची तो वाट पाहत असतानाच वर्तमानपत्रे वाटून संजयचे दारात पावुल टाकताच राहुल त्याच्या गळ्यात पडला. राजाभाऊच्याकडे झालेला प्रकार ऐकून संजयची खात्री झाली की राहुलला दिशा मिळाली व आईच्या देव आपल्याला तारील ह्या मंत्राचे सामर्थ्य समजले. फाटक्या कपड्यात जीवंत केलेला सुदामा आता देवाच्या कृपेने मोठा कलाकार होणार होता.
मागचे पाच महीने अभिनयाचे धडे घेवून ‘उमलते तारे’मधली बालकलाकाराची भूमिका राहुलने ताकतीने नेहमीकरिता जीवंत ठेवली त्याला चाहते प्रेक्षक लाभले, चाहत्यांनी त्याला डोक्यावर उचलून घेतले. राजाभाऊला आपल्या दिग्दर्शनाने व त्याने साकार केलेल्या अभिनयाने त्यांना राहुल ध्रुव तार्याप्रमाणे वाटला.
राहुल आता फाटका राहिला नव्हता, त्याची बड्याबड्या लोकांकडून कौतुक होऊ लागले व तो उमेदीच्या शिखराकडे वाटचाल करू लागला. आईचे आशीर्वाद व संजयचे प्रोत्साहन व राजाभाऊचा वरदहस्त त्याचे पाठीशी होते. संजयला आईचा बंद पडलेला व्यवसाय सुरू करायला राहुलने मदत केली व त्याचे उपक्रमाला ‘सविता मसाले’ नाव देऊन त्याने आईचाही गौरव केला.
संजय व राहुल आता मोठे झाले होते. दोघांचा व्यवसाय जरी भिन्न असला तरी त्यांचे हृदय एक होते. आईला त्यांच्या प्रगतीकडे बघून तिचे उर भरून यायचे. राजाभाऊला आपल्या उतारवयात उमदा कलाकार गवसला होता. वयोमानपरत्वे त्यांची मेहनत कमी पडू लागली होती, त्यांनी आपला सच्चा व उमदा शिष्य समजून त्याला दिग्दर्शनाचे पाठ शिकविले अभिनयाचे धडे दिले॰ राहुलने बोलपटाकडे वळण्याचा मनोदय राजाभाऊंना बोलून दाखविला व त्यांनी सहर्ष रुकार दर्शविला. त्याने चित्रीकरण कसे करायचे, बोलपटाला प्रसिद्धी कशी मिळवायची, ते वितरित कसे करायचे शिकून घेतले.
आजपर्यंत राजाभाऊंनी दिवाकर सविताचा विषय राहुल समोर काढला नाही पण राहुलमध्ये ते नेहमी दिवाकरला बघायचे, तो हुबेहूब त्याचाच सारखा दिसायला होता सोबतच पडद्या मागे पडलेली सविता त्यांच्या डोळ्यासमोर येत होती. त्यांनी राहुल जवळ तिला भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली.
राहुल राजाभाऊंना आपल्या फाटक्या चाळीत घेऊन आला खरा पण त्याला खोलीवर नेताना थोडी लाजच वाटली. पण आईबद्दलचा त्यांचा आदरभाव बघून ते दोघे खोलीत शिरले. सविता अंथरुणावर पडून होती, हरिपाठ वाचत होती. राजाभाऊंच्या नजरेत असलेली, त्यांच्या आठवणीतील सविता मात्र त्यांना दिसली नाही तिच्या जागी एक कृश वृद्ध स्त्री ते बघत होते. हीच का ती सविता जिने नाट्यक्षेत्रात गाजवलेल्या भूमिका, तिचा अतुलनीय अभिनय, तिचा तो शृंगार,फटाकडा आवाज समोर दिसत असलेल्या सवितामध्ये दिसला नाही.
आई बघ राजाभाऊ आलेत, कानावर शब्द जाताच ती उठून बसली, उठताना तिच्या कन्हण्याचा आवाज राजाभाऊच्या कानी पडला. उठून बसली व तिने त्यांना नमस्कार केला व म्हणाली राहुलला दिशा दाखविणारे व अभिनयपटू बनवणारे तुमचे आभार मानावे ते थोडेच. माझ्या प्रकृतीने माला जागीच स्थीर केले. जड अंत:करणाने तिने तिच्या उशाशीच सदैव ठेवलेली ट्रंक उघडली, त्यातून सुभद्रा, भामिनी, देवयानी वठविताना नेसलेली कापड बाहेर काढून राजाभाऊंच्या हाती दिली व म्हणाली त्या वस्त्रातल्या सुभद्रा, भामिनी देवयानीची भूमिका करणारी सविता संपली हो आता, आता फक्त जगायचे आहे ती संजय व राहुलची आई म्हणून. राजाभाऊ सुन्न होऊन तिचेकडे बघतच राहिले व संजय आणि राहुल तिला जाऊन बिलगले. त्या दोघांचा प्राण, धर्म दैवत त्यांची आई सविताच होती.
[बाळ लोखंडे] नागपुर मो. 9273072928
Comments
Post a Comment