mazya buchichya fula

माझ्या बुचच्या फुला.......

तू पांढर्‍या शुभ्र   दांडीचा , कुठे म्हणून डाग नाही, झाडाखाली पडला की प्रेमाने अलगद उचलावा लागतो. उचलतानाही सौन्दर्य जपलेच गेले पाहिजे म्हणून  व्यवस्थित दांडीला दांडी लावूनच तुझ्या सोबत बाकीची फुले वेचली जातात. तुझा सुवास किती मधुर, घरात आणल्यावर पसरट डिशमध्ये ठेऊन तासन्तास घरभर दरवळणारा सुगंध चाखत रहावसा वाटतो. कोमेजून जाऊ नये म्हणून पाण्याचा शिपका मारला की टवटवीत होतो. तसं तुझ आहे. उचलणार्‍याला मोह आवरता आला नाही होता तोवर सुगंध घेतला पण त्या फुलाला टवटवीत ठेवण्याचे भान राहिले नाही. फुलाचे कोमेजणे हा नैसर्गिक धर्म आहे हे न उमजून  उचलणार्‍याची दृष्टी दुसर्‍याच  रंगीत फुलाकडे धाव घेते. हे बुचाच्या फुला तुला कसे कळणार तुझा सत्व राखण्याचा प्रयत्न तोडका पडला पण तू सावरले व पुढच्या मोसमात स्वत:च स्वत:चे रुबाबदार अस्तित्व ताजेपणीच राखून ठेवण्याचे कसब अंगी बाणले, बहरण्याचे दरम्यान दुसर्‍या रंगीबेरंगी  फुलावर कुरघोडी केली, आपलेपण जपले, आपली क्षमता ह्रास होण्या आधीच स्वत:ला उजळवून घेतले व आपल्या भोवती रसिकांना गुंतविले. ह्यालाच म्हणतात जिद्द. तू कुणाचे सौन्दर्य व सुगंधाचा हेवा केला नाहीस. ज्याची त्याला जागा दाखवून दिलीस. येथे सहनशीलता कामी आली, सहनशीलतेला बळाची साथ मिळाली. बुचाचे झाड उंच उंच वाढते इतर फुला प्रमाणे त्याची फुले खुडता येत नाही. जमिनीवरचे फुले वेचताना वाकावे लागते, मान खाली झुकवावी लागते. दुसर्‍यांना वाकवायला तुला साथ मिळाली ती उंच उंच फांद्याची व मजबूत बुंध्याची म्हणजेच जन्मदात्याची. बकुळीच्या फुलाचा सुगंध एकदा कानी बसला की तो कायम राहतो.  माणसाचे आयुष्य बकुळीच्या फुला प्रमाणेच असते, वाळले तरी सुगंधाची आठवण ताजी राहते व म्हणून वयोमान वाढत असले तरी आपले सत्व राखून असावे. 

बाळ लोखंडे 



Comments

Popular posts from this blog

मालव्या योग

गजरा

Bruhat Parashar Hora Shastra , shrushti kram adhyay .