Bharat
भरत
का अचानक हाक आली येण्या स्वगृहाला
प्रश्न पडला परी बोध होईना जीवाला
काय असे घडावे उमजेना रथी हेलावला
तर्क, प्रश्न उफाळिले स्वस्थता ना जीवाला [1]
प्रासादिहि
नीरव कशी स्तब्धता बघता
कुणी ना
केले ना रयतेनी स्वागता
जागीच
पाय थिजले ती बघून मौनता
विचारू
कुणा, भाष्य नाही कशी ही रुक्षता [2]
हर्षिली मनी मंथरा बघूनी भावी राजाला
राजमाता बघ भरत आला राज्याभिषेकाला
मनी हसली राजमाता आलिंगीता तनयाला
त्या भयाण शांतातेला कळेना प्रकार हा कसला [3]
दुरुनी
बघता दोन माता अश्रु ओघळिता
काय झाले
तात का असे पहुडले धरतीला
जवूनी
बघता निष्क्रिय त्या पित्याला
टाहो
फोडी, अश्रु ढाली बघूनी त्या शवाला [4]
गेला उठूनी वृत्त विचारी जावून मंथरेला
तिने अति हर्षि वरतला प्रसंग झालेला
ऐकताची न उमगे रोग कसा हा मातेला
वडील बंधुला स्वार्था घालविलेस वनवासाला [5]
सांगे
आता ना उरले झालो अनाथ मी दुबळा
निघाला
स्वये वनी भेटण्या प्राणप्रिय त्रिकुटला
घेतले
स्वये अनुज, माता अन राजगुरूला
जात होता
वनी वनी धुंडला अखेर रामाला [6]
प्रत्यक्ष सामोरे उभे त्रिकुट ते बघता
सद्गतीत झाला वनवेशात त्यांना बघता
चरण धरले प्राक्षिले चरण बांध अश्रूचा फुटला
दोन हृदये एक झाली विसवली एक चित्ता [7]
पुरे
वनवास चल परतू स्वगृहाला
करू नको
पारखी अनाथ अयोध्येला
नको
प्रार्थना करूस भरता दुरावू कसा वचनाला
जावूनी
परत तू सांभाळ प्रजाजनाला [8]
माला न उमजे काय करावे कसे परतावे
जातो घेवुनी पादुका मम शिरी त्वा ठेवावे
बसवूनी सिंहासनी पादुका तुज नित्य स्मरावे
राज्य ना माझे असे पादुकाचे तयाच्या मी रमावे [9]
त्यागले
सिंहासन, प्रासाद, भुलला मऊ शैयेला
वर्षे
चवदा कुटीत राहुनी सौरक्षीले प्रजेला
आनंदला
मग राम येता, अर्पिले तव चरणी सर्वस्वाला
धन्य
धन्य भरता कसा वाणू तुझ्या बंधु प्रेमाला.
[बाळ
लोखंडे]
Comments
Post a Comment