A poem on Manthara
आठवती बालपणाचे दिवस
पाखरांचे,
गोंजारिले, नटविले,चारविले दाणे मोत्याचे,
कधी न धरले मनी माझे अन सवतीचे,
दृष्ट लागली नजर फिरली
घरभेदीची. [1]
सुचलेच कसे ग तुला मंथरा,
ओतलास तू कानी निखारा,
पेटविलेस तू रान अन आवारा,
धगधगला प्रासाद असा साजरा.[2]
उन्माद माजला कुविचाराचा
भोवती पसारा,
भटकली नाव लागला ना किनारा,
काय साधले कसे उडविले वनी पाखराला,
मंथरेंनी डाव साधला मीन
लागला गळाला [3]
बिछडले आप्त गणगोत खंत ना जीवाला,
पुरविले मी मम हट्ट करुनी जवळ मंथरेला,
संचारीली ती रोम रोमी होण्या जीवन उज्वला,
परी सत्य आणि त्याज्य ना गवसले सुराला [4]
काय कसले न जाणता
विश्वासले
पश्चाताप होता मन उदासिले
वेळ घटका निसटून जाई
कुठेसा
उरल्या जीवनी गळी लागला
फासा.[5] [बाळ लोखंडे]
Comments
Post a Comment