Posts

Showing posts from July, 2020

Upekshit Kaan

बिचारा उपेक्षित कान       चार चौघे एकत्र आले व समवयस्क असतील तर त्यांच्यामध्ये होण्यार्‍या गप्पाचा विषय एकच   नसतो , विविध विषयावर चर्चा होते. काही विषय गंभीर असतात तर काही चित्ताला समाधान देणारे असतात. काही विषय त्याला शेंडा ना बुड पण तोही विषय तिखटमिठ लावून चर्चिल्या जातो. बालपणा पासून ते वृद्धावस्ते पर्यन्त समवयस्कएकत्र आले तर चर्चेला उधाण येते. असा एखादाच असतो की तो कोणत्याच विषयात रस घेत नाही. पण तो सर्व गोष्टी कान लावून ऐकतो पण मौन धरून असतो.       विषय कोणताही असो तो चघळताना वा चर्चिल्या जाताना कानाला जागृत असावे लागते. एकमेकामद्धे होत असलेली बडबड कानाला ऐकाविच लागते , तसे कान फार तीक्ष्ण असतात कोठे काही खूट्ट झाले की कान टवकारल्या जातात.       कान चेहर्‍याला चिकटून असतात , पण ते दुर्लक्षिल्या जातात. चेहर्‍याचे सौंदर्याचे वर्णन किती किती केल्या जाते , नाकी डोळी सुंदर पण कानी डोळी सुंदर म्हटल्या जात नाही , अगदी डोक्यावरच्या   केसा पासून तर हनुवटी पर्यन्त. केस कसे लांबसडक आहेत , कुरळे आहे...

Bharat

भ रत का अचानक हाक आली येण्या स्वगृहाला प्रश्न पडला परी बोध होईना जीवाला काय असे घडावे उमजेना रथी हेलावला तर्क , प्रश्न उफाळिले स्वस्थता ना जीवाला [1]             प्रासादिहि नीरव कशी स्तब्धता बघता             कुणी ना केले ना रयतेनी स्वागता             जागीच पाय थिजले ती बघून मौनता             विचारू कुणा , भाष्य नाही कशी ही रुक्षता   [2] हर्षिली मनी मंथरा बघूनी भावी राजाला राजमाता बघ भरत आला राज्याभिषेकाला मनी हसली राजमाता आलिंगीता तनयाला त्या भयाण शांतातेला कळेना प्रकार हा कसला   [3]             दुरुनी बघता दोन माता अश्रु ओघळिता             काय झाले तात का असे पहुडले धरतीला        ...

A poem on Manthara

मंथरा तू आठवती बालपणाचे दिवस पाखरांचे , गोंजारिले , नटविले , चारविले दाणे मोत्याचे , कधी न धरले मनी माझे अन सवतीचे , दृष्ट लागली नजर फिरली घरभेदीची. [1]                            सुचलेच कसे ग तुला मंथरा ,                         ओतलास तू कानी निखारा ,                            पेटविलेस तू रान अन आवारा ,                            धगधगला प्रासाद असा साजरा.[2] उन्माद माजला कुविचाराचा भोवती पसारा , भटकली   नाव लागला ना किनारा , काय साधले कसे उडविले वनी पाखराला , ...

Manogat

मनोगत आज वयाच्या   पंच्याहात्तराव्या   वर्षात पदार्पण करीत आहे , माझा पंच्याहत्तराव्या वर्षातला प्रवेश तुम्हा सगळ्यांना आनंदाचा क्षण आहे आणि मलाही आजचा दिवस अभिमानास्पद वाटतो.   एकीकडे पार केलेला प्रदीर्घ काळ व दुसर्‍या बाजूला मोजके राहिलेले वर्षे स्पष्ट दिसत असल्याने काळजाच्या एका कोपर्‍यात हुरहुरीने जागा घेतल्या सारखे वाटते.आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा हे गीत तरुणांसाठी त्यांनी उत्तुंग शिखर काबिज करावे म्हणून गायले असले तरी वृद्धानी भौतिक सुखाला तिलांजली देवून मोक्ष गाठवा असाही अर्थ ह्या गाण्यात अभिप्रेत आहे. भूत काळाकडे बघताना आपण किती पुण्याची कामे केली आणि किती अपराध केले हे जाणून घ्यायला हवे. खरेतर रोजचं सूर्योदयापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभ्ररात काय चांगले काय वाईट कृत्य केलीत ह्याचा आढावा घेतला पाहिजे व हे मीअजूनही करीत आहे. . गत आयुष्यकडे बघून समाधानाची बाजू भक्कम असल्याचे मला जाणवते व ती मजबूत   असण्याला माझ्या प्रकृतीचे स्वास्थ्याला प्रथम क्रमांक द्यावा   लागेल व तुमचे सगळ्यांचे माझ्यावर असलेल्या प्रेमाला दूसरा क्रमांक व तिसरा क्रम...

mazya buchichya fula

माझ्या बुचच्या फुला....... तू पांढर्‍या शुभ्र    दांडीचा , कुठे म्हणून डाग नाही , झाडाखाली पडला की प्रेमाने अलगद उचलावा लागतो. उचलतानाही सौन्दर्य जपलेच गेले पाहिजे म्हणून   व्यवस्थित दांडीला दांडी लावूनच तुझ्या सोबत बाकीची फुले वेचली जातात. तुझा सुवास किती मधुर , घरात आणल्यावर पसरट डिशमध्ये ठेऊन तासन्तास घरभर दरवळणारा सुगंध चाखत रहावसा वाटतो. कोमेजून जाऊ नये म्हणून पाण्याचा शिपका मारला की टवटवीत होतो. तसं तुझ आहे. उचलणार्‍याला मोह आवरता आला नाही होता तोवर सुगंध घेतला पण त्या फुलाला टवटवीत ठेवण्याचे भान राहिले नाही. फुलाचे कोमेजणे हा नैसर्गिक धर्म आहे हे न उमजून   उचलणार्‍याची दृष्टी दुसर्‍याच   रंगीत फुलाकडे धाव घेते. हे बुचाच्या फुला तुला कसे कळणार तुझा सत्व राखण्याचा प्रयत्न तोडका पडला पण तू सावरले व पुढच्या मोसमात स्वत:च स्वत:चे रुबाबदार अस्तित्व ताजेपणीच राखून ठेवण्याचे कसब अंगी बाणले , बहरण्याचे दरम्यान दुसर्‍या रंगीबेरंगी   फुलावर कुरघोडी केली , आपलेपण जपले , आपली क्षमता ह्रास होण्या आधीच स्वत:ला उजळवून घेतले व आपल्या भोवती रसिकांना गुंतविले. ...

Bakulichi phool : on 75th birthday of my baba

बकुळीची फुलं     बाबा कधीच बकुळीची फुलं झाडाची तोडत नाहीत , जमिनीवर पडलेलीच चार पाच फुलं अगदी प्रेमाने वेचतात , अलगद मूठ बांधून सुवासाचा आनंद घेत सहजच बोलतात कि हि फुलं त्यांची खूप आवडीची आहेत , बारीकशी आहेत पण कोमेजूनच काय तर सुकल्यावरही अशीच सुवासिक असतात .   बाबांना जे सुचवायचं होत ते   वया परत्वे समजायला लागलं . पण बाबा तुमची हि तिन्ही फुलं बकुळी पेक्षाही वरचढ निघालीत , बुचाच्या फुलांप्रमाणे , ती कशी ?;   मलूल झाल्यावर अगदी सूकूनही पाण्यात टाकल्या वर परत टवटवीत होतात . बस प्रेमाच्या ओलाव्याची गरज असते . खरंच तो भावनेतला ओलावा ती प्रेमाची उब सोडून दुसऱ्या विश्वात जावं लागलं . साध्याच अपेक्षा होत्या पण त्यांच्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला . बाबा आम्हालाही आमच्या विश्वात झेप घ्यायची होती , गरुडाची पंख हवी होती , मिळाली चिमणीची . स्वतःचा जग निर्माण करतांना अनेक अडचनींना तोंड द्यावं लागलं ,   का तशी तयारी करून नाही घेतली ?. जगाशी द...