Bakulichi phool : on 75th birthday of my baba

बकुळीची फुलं    

बाबा कधीच बकुळीची फुलं झाडाची तोडत नाहीत , जमिनीवर पडलेलीच चार पाच फुलं अगदी प्रेमाने वेचतात , अलगद मूठ बांधून सुवासाचा आनंद घेत सहजच बोलतात कि हि फुलं त्यांची खूप आवडीची आहेत , बारीकशी आहेत पण कोमेजूनच काय तर सुकल्यावरही अशीच सुवासिक असतात.  बाबांना जे सुचवायचं होत ते  वया परत्वे समजायला लागलं. पण बाबा तुमची हि तिन्ही फुलं बकुळी पेक्षाही वरचढ निघालीत, बुचाच्या फुलांप्रमाणे , ती कशी?;  मलूल झाल्यावर अगदी सूकूनही पाण्यात टाकल्या वर परत टवटवीत होतात. बस प्रेमाच्या ओलाव्याची गरज असते. खरंच तो भावनेतला ओलावा ती प्रेमाची उब सोडून दुसऱ्या विश्वात जावं लागलं. साध्याच अपेक्षा होत्या पण त्यांच्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला.

बाबा आम्हालाही आमच्या विश्वात झेप घ्यायची होती, गरुडाची पंख हवी होती, मिळाली चिमणीची. स्वतःचा जग निर्माण करतांना अनेक अडचनींना तोंड द्यावं लागलं,  का तशी तयारी करून नाही घेतली?. जगाशी दोन दोन हाथ करायची तयारी करून घ्यायची होती, तुम्ही नमत घ्यायला शिकवलं. परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकवलं. मान द्यायला शिकवलं , मान घ्यायला का नाही शिकवलं? इतरांचा मान ठेवतांना स्वतःचा स्वाभिमान दूर ठेवला जातो. स्वाभिमान जपता यायला हवा ? ह्या साठी जगाला टक्कर द्यायला नुसते शिंग असून चालत नाहीत त्यात बळ हवे.   अवतार घ्यायला आत्मविश्वास हवा, नुसता आधार नको. काहीतरी कमी राहिली बाबा, तुमच्या देण्यात किंव्हा आमच्या घेण्यात. कि माझं वय तुमच्या आणि आईच्या प्रयत्नांना जुमानले नाही? हेच खरं, कि देण्यार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.

 तुम्ही रागावलात तर खूप राग यायचा , मन बंड करून उठायचे पण आई रागावली कि रडू यायचे. आम्हाला विशेषतः मला घडवतांनाची तुमची दोघांचीही तळमळ आईच्या भूमिकेत आल्यवर कळते.

तुम्ही निसर्गाची आवड आमच्यात निर्माण केली. निसर्ग कडे बारकाईने बघण्याची कला तुमच्याच मुळे मिळाली. वाईटातल्या वाईट गोष्टीतूनही चांगलं शोधणे तुम्हीच शिकवलं. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती चांगलीच भासते. तुम्ही प्रेमाने जोडलेल्या प्रत्येकानं कडून आम्हाला खूप प्रेम मिळाले , भरभरून कौतुक मिळालेच , आणि पुढेही मिळेलच. .पण  जगातील सर्व लोकं असे नसतात  ते चांगल्यातुन वाईट शोधतात. समजून घेणारे कमी अजमवणारे जास्त आहेत.   

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्या वर काहीतरी नवीन शिकायचं हे तुम्ही तुमच्या स्वकर्तुत्वनी आम्हाला नकळत शिकवलं. माझ्या लहानपणी कर्नाटक संघात बॅडमिंटन खेळणारे , शिटी वर पूर्ण गाणं जसच्यातस उमटवणारे लाकडाच्या ठोकळ्यात आकृत्या शोधून त्यात आपली कल्पना ओतू लागले. ते करतांना कॅसेटवरील नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत च्या धुंदीत एक एक लाकडाचे पिसेस घडवतांना आम्ही हि घडत होतो. प्रत्येक लाकडाच्या मूर्तीत एक कहाणी आहे. सगळ्या मुर्त्या एका दमात घडल्या असे नाही खूप महिनत घ्यावी लागली. काही कल्पनेपेक्षा सुंदर झाल्या,  काही कल्पकतेला मोड घालून तयार केल्या गेल्या तर काही तीन तीन दा मोडून तयार कराव्या लागल्या. म्हणजे मोडला तरी घडवायचं असत हे सहज शिकवल्या गेलं. आता तुमच्या नातवंडांनाहि हेच शिकवाल, खात्री आहे.

सगळंच तुम्हीच शिकवायला हवं हि अपेक्षाही चुकीचीच आहे. तुम्ही तोडण्यापेक्षा जोडणं  शिकवलं , एक घाव दोन तुकडे आजची रीत आहे पण जोडून ठेवणे संस्कृती आहे.

एक बुचीच फुल.......

Snehal jarulkar

08/07/2020


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Muhurta for Travel

मालव्या योग

वार क्रम