Third House in Astrology (तृतीय स्थान)

कुंडलीतील तृतीय स्थानाला पराक्रम स्थान आणि सहज भाव अशी नावे आहेत. हे एक उपचय स्थान आहे. उपचय म्हणजे वृद्धी देणारे स्थान.  त्यामुळे रवीला इथे बल प्राप्त होते. तो जातकास शूर ,पराक्रमी, साहसी, धैर्यवान व धोरणी बनवेल. पण रवी रवी इथे दूषित नसावा.इथे रवी चांगल्या स्थितीत असता कुंडलीचा दर्जा वाढतो.
तृतीयात स्त्री ग्रह किंव्हा तृतीयेश स्त्री ग्रह असले तर बहिणींची संख्या जास्त असते. आताच्या काळात पाठीवर बहीण असते असे म्हणू.तसेच पुरुष ग्रह वा तृतीयेश पुरुष ग्रह असेल तर भावांची संख्या जास्त असेल, म्हणजे पाठीवर भाऊ असेल.  भावंडांच्या सुखाचा विचार करताना तृतीयेश त्रिक भावात असेल तर भावंडांचे सुख कमी राहील. आणि केंद्र त्रिकोणात असता भावंडांमध्ये प्रेम वृद्धिंगत होईल.  
भावंडांचा कारक मंगळ आहे तो सुद्धा बंधू प्रेमासाठी लक्ष्यात घ्यावा लागेल कारण ह्या स्थानात मंगळ असता बंधू भगिनींचे प्रेम कमी करतो , एकमएकांशी पटत नाही. कारण मंगळ हा स्वतः लढवय्या बाण्याचा आहे. भावंडांमध्ये समंजस राहत नाही. इथला मंगळ आत्मघातकी बनवतो.
ह्याठिकाणी शुभ ग्रह असता अगर तृतीयावर शुभ ग्रहांची दृष्टी असता वा तृतीयेश शुभ भावात असता किंव्हा उच्च, स्वगृही असता शौर्य नावाचा योग होतो. असा जातक शौर्यावन असून त्याला भावंडांचे सुख प्राप्त होते व लोकांमध्ये वाहवा होते.
शुभ चंद्र ह्या स्थानात असता स्वभाव मनमिळाऊ असतो.अक्षरे वळणदार पण गोलगोल असतात. चर राशीतील चंद्र प्रवासाची आवड देतो. अध्यात्माकडे मन लागत.
ह्या भावात बुध तीक्ष्ण बुद्धी , उत्तम स्मरणशक्ती, वाचनाची व लिखाणाची आवड देतो. तसेच राजकारणात रुची वाढवतो. वत्कृत्व , पत्रव्यवहार, दळणवळण,  दळणवळणाची  साधने, सखोल अभ्यासाची आवड , हिशोब, संभाषण, कॉम्पुटर, टेलिकॉमुनिकेशन ह्यासाठी इथला बुध सहाय्यक ठरतो.
गुरूला हे स्थान मानवात नाही, करण हे स्थान पराक्रमाचे आहे, साहसाचे आहे ; साहस पराक्रम ह्या गोष्टी गुरूच्या स्वभावात नाही. ह्या स्थानातील गुरू अतिसमांजस पणा जातकास प्रदान करतो. जातक मुळीच धाडसी नसतो. सामंजस्याने परिस्थितीवर मात करतो वा परिस्थितीशी जुळवून घेतो. धर्मनिष्ठ असतो. तिर्थयात्रे निमित्य पुष्कळ प्रवास घडतात.
ज्यांच्या ह्या भावात शुक्र  असतो त्यांचा स्वभाव उल्हसित, शेजारी, नातेवाईक यांपासून सुख उपभोगणारा असतो. बोलण्याची शैली खूप लाघवी आणि आकर्षक वागणुकीने सहज कामे होतात. 
जिथे मंगळ जोर जबरदस्तीने कामे करून घेतो तेथे शुक्र केवळ आपल्या वाकचतुर्याने पराक्रम गाजवतो.शुक्र आणि बुध , शुक्र आणि गुरू ह्या जोड्या इथे खूप चांगली फळे देतात.ललित लेखन, काव्य, अध्यात्मिक , धार्मिक लेखन घडवतात. कुंभ लग्नाला शुक्र आणि गुरू ही जोडी विशेष अध्यात्मिक लेखनाला प्रवृत्त करते. आणि नवमात उंचीचा शनि असता दुधात साखर कारण शनी व्ययेश होऊन धर्म स्थानात उचेचा होऊन गुरू शुक्राच्या दृष्टीत येतो. मनाची घडण अध्यात्मिक असते. अध्यात्माला ललित लेखनाची जोड मिळते.
ह्या ठिकाणी शनी जातकाला विशेष धाडसी धीट बनवतो. जगात खूप संघर्ष करूनऊभे राहायला शिकवतो. अश्याया लोकांची निराशेकडे झुकण्याची मनाची तयारी होते . म्हणजे फार फार कष्टाने त्यांचा भाग्योदय वयाच्या 30व्या वर्षी होतो. भावंडांसाठी येथील शनी चांगला नाही. कारण हा शनी जातकास मनाने खूप कठोर बनवतो.
हे lower mind म्हणजे मानसिक हीनतेचे स्थान असल्यामुळे येथे पाप ग्रह जास्त पराक्रमी, धाडसी व कठोर मनाचे होऊन संबंधात दाहकता वाढवतात.  राहू ह्याठिकाणी दिखाऊ धीटपणा देतो, गुप्तपणे पाप कृत्य करणारा असतो. ह्या लोकांना सरपटणाऱ्या प्राणांपासून भय असत. ह्या ठिकाणी शनी राहू युती जातकाला भित्रा बनवते.
केतू मुळे जातक गुणी , शत्रूंचा नाश करणारा, धनवान  आणि वादविवादात कुशल असे बनवतो. पण डोक्यात काहीतरी भ्रमिक कल्पना असतात. 
जेंव्हा तृतीयेश  किंव्हा तृतीय भाव पापग्रहांमुळे बिघडतो तेंव्हा घश्या संबंधी, काना संबंधी आणि मानेच्या संबंधी आजार होतात.

स्नेहल जरूळकर
ज्योतिष्याचाऱ्या
98604 42427

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Muhurta for Travel

मालव्या योग

वार क्रम