साथ गुणांनाची अवगुणांची



जिवनाचे साफल्य तेव्हांच असते
गुणाला अवगुणाची साथ असते
अवगुण वर्जिता अवगुणी गुणी होतो
गुणी गुणवान लौकिकास पात्र होतो

हिंंग,मीठ,मिरची तसे अवगुणी
मेळ साधण्या सुगरण घेते प्रमाणी
लज्जत व्यंजनाची न होयी अळणी
साध्य होता बेत आनंदी ती ग्रुहीण

ताप, संताप,क्रोध तसे अवगुणी
नसता शांती संयमन होती जिवघेणी
मिळता स्तब्धता, एकांत जो असे गुणी
त्राग वैताग पळती होता वरचढ सद्गुणी

करकशा, तोतरा स्वर असे अवगुणी
भंगवि लय ताल शिरुनि आसमंती
साथ करते एक सुरांनी लय ती गुणी
मैफिलिची सय टिकावी अशी ती प्रवणी

दांडगाई, मस्ती, राडा आहेत अवगुणी
भल्याभल्यांची नसतिच होते छळणी
रुप बदलवि राडा करुनि कवायत ती गुणी
व्रुद्धिंगावी बळ,धीर, चुरस कवायतिची करणी

नसती जर हजेरी अवगुणाची शरिरी
माजला असता तो बहुगुणी अंतरी
परी जाग्रुत तो बहुगुणी न झाके पापणी
जोवरि न कळे हिशेबी द्वयींची देणिघेणी
              बाळ लोखंडे

Comments

Popular posts from this blog

47th Wedding anniversary poem

गजरा

Third House in Astrology (तृतीय स्थान)