Bandhanyog in Astrology
बंधनयोग
बंधनयोग हा एक प्रकारे अरिष्ट निर्माण करणारा योग आहे. जीवनातील हे असं अरिष्ट आहे जे जातकाच्या प्रतिभेवर तसंच प्रतिमेवर परिणाम करून जातं. बंधनयोग केवळ जेल, कारागृह वा कारावास इथपर्यंतच सीमित नसून ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे.
कित्येकदा मनातील
विचार , व्याधी , इच्छा अपेक्षा अश्या अनेक भावना मनातच दाबाव्या लागतात, त्या प्रगट करणं शक्य नसत किंव्हा त्या प्रगत करण्यास जातक असमर्थ असतो . तेंव्हा तो स्वतःला अस्या अदृश्य बंधनात असल्याचे समजून अज्ञात घुटन मध्ये झुरत जगत असतो , ह्याला मानसिक बंधनयोग म्हणतात. कुंडलीतील चंद्राच्या व आत्माकारकाच्या स्थितीवरून मानसिक बंधनाची तीव्रता कळू शकते.
जेल, कारागृह , नजर कैद, प्रायश्चित्त म्हणून लादलेले बंधन हे शारीरिक बंधनयोग आहेत. कोणत्याही कारणांमुळे शारीरिक हालचालींवर येणारे बंधन म्हणजे शारीरिक बंधनयोग आहे.
बंधनयोगसाठी राहू, शनी आणि मंगळ हे तीन ग्रह जवाबदार ठरतात.
राहू हा
नैसर्गिक पापग्रह असून तो खोटेपणा ,फसवेगिरी, सूडवृत्ती, खोटे आरोप ह्यांचा कारक आहे.
शनी कर्माचा कारक असून तो एक सर्वश्रेष्ठ न्यायाधीश असल्यामुळे केलेल्या प्रत्येक कर्मांचे परिणाम देण्यास तत्पर असतो. शनीच्या दशेत , अंतर्दशेत, आणि साडेसातीत केलेल्या कर्मांची फळे मिळतातच.
मंगळचा स्वभाव आक्रमक तसाच हिंसक आहे. जो प्रायश्चित घेण्यास भाग पडतो.
ह्या तीन ग्रहांचा कुयोग बंधनयोगास कारणीभूत असतो.
कुंडलीतील ग्रह
स्थिती बंधनयोग निर्माण करते :
1) लग्न
किंव्हा लग्नेश पापमध्यत असता बंधनयोग होतो.
2) लग्न
, लग्नेश, चंद्र किंव्हा आत्माकारक पापकर्तरीत असता बंधनयोग
होतो.
3) लग्न
, लग्नेश व सूर्य पापमध्यत वा पापकर्तरीत असता बंधनयोग देतो.
चंद्र व
सूर्य ह्या राजकारक ग्रहांचा जेंव्हा बंधनयोगशी संबंध येतो तेंव्हा राजकीय आदेशानुसार बंधन येते.
4) लग्नेश
व षष्ठेश युती शनी सह केंद्र त्रिकोणात असता बंधनयोग असतो
5) लग्न
वा लग्नेश शुभ आणि पाप ग्रहांचा मध्ये असता खोट्या आरोपामुळे बंधनयोग येतो.
6) 2, 5, 9 आणि 12 स्थानातले पाप ग्रह बंधनयोग देतात.
7) लग्नेश
आणि षष्ठेश केंद्र त्रिकोणात राहू किंव्हा केतूने युक्त असता बंधनयोग देतात.
8) रवी
-राहू ,रवी - शनी युती किंव्हा राजग्रहा सोबत दशमेश
शनीची युती असता बंधनयोग होतो.
9) लग्नेश,
सप्तमेश व अष्टमेश चंद्राच्या केंद्रात असता बंधनयोग देतात.
10) 2-12, 3-11, 4-10, 5-9 आणि 6-12 मध्ये सारख्याच संख्येत ग्रह असता बंधनयोग होतो.
11) कर्क
लग्नाला शुक्र रवी च्या युतीत लग्नात असता बंधनयोग देतो. लोकमय टिळकांच्या कुंडलीत असा योग आहे
12) लग्नेश
चंद्र कर्क लग्न कुंडलीत अष्टमेश शनीने युक्त असता त्रिक स्थानात असता बंधनयोग देतो.
13) शनी
किंव्हा मंगळ लग्नेश असून व्ययशाशी युत असून भाग्येश बिघडलेला असता बंधनयोग देतो.
बंधनयोग कुंडलीत
असता व्यक्ती कसाही का असेना जीवनात त्याला कारागृह भोगावेच लागते.
ज्योतिष्याचार्या
स्नेहल जरुलकर
98604 42427
Comments
Post a Comment