सूर्य ग्रहण
21 जून 2020 , ज्येष्ठ कृ . अमावास्या कंकणाकृती सूर्यग्रहण . ह्या वर्षी एकंदर पाच ग्रहणे आहेत त्यापैकी केवळ एकच ग्रहण भारतातून दिसणार आहे. ग्रहण मिथुन राशीत मृग आणि आर्द्रा नक्षत्रांतून होत आहे. वेध आरंभ शनिवारी रात्री 9.40 ला सुरु होईल. बाल, वृद्ध व रोगी यांनी रविवारी 5 पासून वेध पाळावे. राजंदेकर पंचांग नुसार 10.12 ला स्पर्श , 11.53 मध्य आणि 1 वाजून 44 मि. मोक्ष. वृषभ , मिथुन आणि कर्क ह्या राशीच्या लोकांना तसेच रोहिणी मृग, आर्द्रा आणि पुनर्वसू हि जन्मनक्षत्र असणाऱ्या व्यक्तींना त्रासदायक आहे. तसाच हे ग्रहण ज्येष्ठ महिन्यात होत असल्यामुळे सत्ताधारी लोकांना , सात्विक वृत्तीच्या लोकांना त्रासाचे ठरणार आहे. ग्रहणाचे दिवशी बुध , शुक्र, गुरु आणि शनी हि ग्रह वक्री आहेत . आणि राहू केतू हि नेहमीच वक्री असणारी ग्रह आहेत. असे एकंदर 6 ग्रह वक्री आहेत . रशिपरत्वे ग्रहणाची फले : मेष : लक्ष्मी प्राप्ती, वृषभ : द्रव्यनाश, मिथुन : शारीरिक पीडा, कर्क : प्रकृतीस त्रास, सिंह : द्रव्...