Bruhat Parashar Hora Shastra , shrushti kram adhyay .
सृष्टीक्रम कथन अध्यायात सर्वव्यापी, सगुण तसेच निर्गुण विष्णूच्या तीन शक्ती आहेत त्याम्ह्णजे सत्व ,रज,तम् . सत्व शक्ती प्रधान श्रीशक्ती , रज शक्ती प्रधान भुशक्ती व तम् शक्ती प्रधान अंधकारमय नील शक्ती आहे. ह्या तीन शक्ती संकर्षण, प्रद्युम्न, आणि अनिरुद्ध ह्या नावाने आहेत. तम् शक्तीने संकर्षण, रज शक्तीमुळे प्रद्युम्न, तसेच सत्व शक्तीचे अनिरुद्ध असे आहेत. संकर्षणामुळे महातत्वाची, अनिरुद्धमुळे ब्राह्मची आणि प्रद्युम्नमुळे अहंकाराची निर्मिती झाली. हा अहंकार जास्त महत्वाचा आहे, जेव्हा अहं ची निर्मिती होते तेव्हांच सृष्टीतील, सत्व, रज तम् ह्या गुणांनाचा,तसेच ह्या तीन तत्वांचा आणि शंक्तींचा विचार केला जातो. म्हणजेच जसे हे त्रिगुण, त्रि शक्ती महत्वाच्या आहेत तेवढंच हे धारण करणारे शरीर . ज्याला आपण लग्न म्हणतो. ज्यातून ' मी' पण कळतं. मीपणा , अहं हा जीव निर्मितीचा अविभाज्य घटक आहे. ह्याच अहंकाराचे तीन भेद आहेत, सात्विक, राजस आणि तामस. सात्विक अहंकारातून देवतांची निर्मिती होते. राजसी अहंकारातून इंद्रिय बनले, आणि तामसी अहंकाराने पंचमहाभूते तयार झालीत. आपले शरीरही पंचहाभू...